नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे 4 वाजेच्यासुमारास रविनगर भागात एका युवकाला गावठी कट्ट्यासह पकडले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार जसवंतसिंघ शाहु, संजय केंद्रे, दशरथ जांभळीकर, तानाजी येळगे, रवि बाबर हे 11 जुलै रोजी रात्रीची गस्त करत असतांना रविनगर भागात त्यांना अजय महेशसिंह ठाकूर-तोमर याच्याकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे सापडली. दत्तात्रय काळे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अजय महेशसिंह ठाकूर विरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास तोंडी आदेशाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बिच्चेवार हे करीत आहेत.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी अशा प्रकारे कट्टे बाळगणाऱ्या लोकांना पडले तर त्या पोलीस पथकाला 10 हजार रुपये बक्षीस देणार असल्याचे जाहिर केले आहे. हे सांगत असतांना नांदेड शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही गुन्हे शोध पथकाने अवैध हत्यार पकडण्याची कार्यवाही केलेली नाही अशी खंत सुध्दा व्यक्त केलेली आहे.
