जनौद्दीन पटेल
मुखेड- मुसळधार पाऊस पडत असून नदी-नाल्यांना महापूर आला आहे.एका नाल्याच्या पुरात एक बालक वाहून गेला आहे तर जांब येथे एक म्हैस मृत्युमुखी पडली आहे .
सविस्तर वृत्त असे की कर्नाटक येथील आठ वर्षांचा बालक साईनाथ प्रमोद लांडगे हा आपल्या आजोळी कापरवाडी येथे आला होता तो मामाच्या शेतातुन नाला ओलांडून घराकडे येत असताना पाण्याचा विसर्ग अचानक वाढल्याने तो नाल्यात वाहून गेला त्याचा मृत्यदेह दोन किलोमीटर अंतरावरील बोंमनाळी येथील नाल्यात आढळून आल्याची माहिती तलाठी बालाजी बोरसुरे यांनी दिली आहे .तर जांब येथे एक म्हैस पाण्यात वाहून गेली आहे .