नांदेड (ग्रामीण)

माहुर तालुक्यातील अजनी येथे शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-माहूर तालुक्याच्या अजनी गावात 10 जुलै रोजी एका 27 वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
मागील कांही दिवसांपासून माहूर तालुक्यात समाधानकार पाऊस सुरू आहे. अजनी गावातील शेतकरी आकाश भिमराव कुरसंगे (27) हे 10 जुलै रोजी आपल्या शेतात कोळपणी करीत असतांना सायंकाळी 5 वाजता पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी आकाश कुरसंगे हे एका झाडाखाली जाऊन उभे राहिले आणि त्याच वेळी विजेने त्या झाडाचा वेध घेतला आणि आकाश कुरसंगे यांचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेने अजनी गावात शोककळा पसरली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.