नांदेड(प्रतिनिधी)-यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर भागातील भुकंपाच्या केंद्र बिंदुत हालचाल झाली आणि त्याचे अनुभव नांदेड, हिंगोली जिल्ह्यात सुध्दा अनुभवायला आले. रिश्टर स्केलवर 4.4 अशी या भुकंपाची नोंद आहे. जनतने अफवांवर विश्र्वास ठेवू नये असे आवाहन नांदेडचे पोलीस मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
आज सकाळी 8.33 वाजेच्यासुमारास नांदेड शहरातील छत्रपती चौक, पोलीस कॉलनी, गोदावरीनगर, मालेगाव रोड वजिराबाद, पुर्णा रोड, फरांदेनगर, सिडको, नवीन पुल, तरोडा, नालंदानगर, काबरानगर या भागांना भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. शहराशिवाय अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, उमरी, गणपूर, कोंढा, अर्धापूर, कामठा या गावात सुध्दा भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या सोबतच हिंगोली जिल्ह्यातील कांही गावांना सुध्दा भुकंपाचे सौम्य धक्क जाणवले.
राष्ट्रीय भुकंप शास्त्र केंद्राने निर्गमित केलेल्या माहितीनुसार भुकंपाचा केंद्र बिंदु यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे आहे. तेथे या भुकंपाची तिव्रता 4.4 होती. भुकंपाचे केंद्र जमिनीखाली 10 किलोमिटर असल्याचे सांगण्यात आले. भुकंपाची माहिती प्राप्त झाल्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्र्वास ठेवण्याअगोदर प्रशासनाकडून त्याची माहिती घ्या. जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. खबरदारी जरूर घ्या पण भुकंपापासून भिती बाळगु नका असे डॉ.विपीन यांनी सांगितले आहे.
