क्राईम

ऑम्लेट गाडा चालविणाऱ्याला लुटणारे दोन जण पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-दोन युवकांनी एका ऑम्लेट विक्रेत्याला चाकूने मारहाण करून त्याच्याकडील 4 हजार 500 रुपये लुटून नेल्याचा प्रकार विद्युतनगरच्या मारोती मंदिराजवळ घडला. आज दि.10 जुलै रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी या दोघांना 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
भारत विठ्ठलसिंह चौहान यांचा विद्युतनगर भागात ऑम्लेट गाडा आहे. दि.8 जुलै रोजी रात्री 10.30 वाजेच्यासुमारास आपला गाडा बंद करून ते गाडा घेवून घराकडे जात अतसांना विद्युतनगर भागातील हनुमान मंदिराजवळ दोन युवक आले आणि त्यांनी कांही एक न बोलता भारत चव्हाणला लाकडाने मारहाण करून त्यांच्या खिशातील 4 हजार 500 रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे. ते आरडा ओरड करत असतांना लोक जमले म्हणून हे दरोडे खोर पळून गेले. त्यांची नावे अक्षय उमाकांत ठाकरे(25) आणि अजय कोंडीबा खंदारे (22) अशी आहेत.
विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक एकनाथ देवके यांच्याकडे देण्यात आला. दोन्ही दरोडेखोरांना 9 जुलै रोजी अटक करण्यात आली. आज 10 जुलै रोजी एकनाथ देवके, पोलीस कर्मचारी कदम आणि रामदास सुर्यवंशी यांनी अक्षय ठाकरे आणि अजय खंदारे यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोघांना 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविल आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *