कोविड कालखंडामुळे सन 2020-21 या वर्षातील बदल्या खुप उशीरा झाल्या. त्यानंतर 2021 मध्ये सुध्दा कोरोनाने आपला प्रभाव सुरूच ठेवला होता. या पार्श्र्वभूमीवर 30 जून 2021 पर्यंत कोणत्याही सर्व साधारण बदल्या करण्यात येवू नयेत एखादी अपवादात्मक परिस्थिती त्यातून वगळण्यात आली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये शासनाने नव्याने सर्वसाधारण बदल्या करण्यासंदर्भाने मर्यादीत स्वरुपात 14 ऑगस्ट 2021 पर्यंत बदल्या करण्यात मान्यता दिली आहे. 14 ऑगस्ट 2021 नंतर कोणतीही बदली अनुज्ञेय राहणार नाही.
सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र कोरोना बाधीत राज्य आहे. तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता विचारात घेवून बदली भत्यांचा खर्च मर्यादीत करण्याच्या दृष्टीने सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या 15 टक्के एवढ्या मर्यादेत करायच्या आहेत. 15 टक्के मर्यादेत बदल्या करतांना त्या पदावर विहित कालावधी पुर्ण झालेल्या सर्व पात्र अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पैकी ज्यांचा संबंधीत पदावर जास्त कालावधी पुर्ण झाला आहे. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्राधान्याने बदली करण्यात येणार आहे. सर्वप्रथम सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही 31 जुलै 2021 पर्यंत पुर्ण करण्यात यावी. सर्व साधारण बदल्यांची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर जी पदे रिक्त राहतील केवळ अशाच रिक्त पदांवर बदल्या 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत करता येतील. विशेष कारणास्तव बदली करायची असेल तर समक्ष प्राधिकाऱ्याच्या लगतच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करण्यात येतील. विशेष कारणासाठी सुध्दा बदल्यांची मर्यादा 10 टक्के अशी मर्यादीत करण्यात आली आहे. ज्या विभागांमध्ये बदलीची कार्यवाही करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसीत केलेली आहे अशा विभागाने त्या प्रणालीचा वापर करायचा आहे. 6 शासन निर्णय शसानाने संकेतांक क्रमांक 202107091753143407 नुसार महाराष्ट्र राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
——