नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना कालावधीत पोलीस ठाणे मुदखेड येथील पोलीस अंमलदार किरण ईरबाजी तेलंगे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबियांना 60 लाख रुपयांचा धनादेश पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी किरण तेलंगेच्या कुटूंबियांना आज दिला.
दि.20 डिसेंबर 2020 रोजी मुदखेड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार किरण ईरबाजी तेलंगे (बकल नंबर 2208) यांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला होता. पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविलेल्या सानुग्रह अनुदानाच्या शिफारसीला त्यांनी मंजुर केले.
आज दि.9 जुलै रोजी मनिषा किरण तेलंगे, त्यांची दोन मुले ऋतुराज आणि कृृष्णकांत यांना प्रत्येकी 20 लाख रुपये असा एकूण 60 लाख रुपयांचा धनादेश पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी त्यांना दिला. कोरोना काळात सुध्दा आपल्या कर्तव्यात कसुर न ठेवता किरण तेलंगे यांनी आपले काम हिंमतीने केले. पण दुर्देवाने त्यांचा जीव गेला. किरण तेलंगे यांची एकूण सेवा 26 वर्ष झाली होती. याप्रसंगी पोलीस अधिक्षकांनी तेलंगे कुटूंबियांना भविष्यातील कोणत्याही अडचणींना मदत करेल असे सांगितले. याप्रसंगी पोलीस कल्यण विभागाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, चौधरी यांनी सुध्दा तेलंगे कुटूंबियांची संवाद साधून त्यांना धीर दिला.
