

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे आमुदरा, शिकारघाट येथे दोन जणांनी मिळून एका 47 वर्षीय माणसाचा 7 जूनच्या रात्री 10 ते 8 जूनच्या पहाटे 7 वाजेदरम्यान खून केला आहे.
प्रेमसिंघ धरमसिंघ रामगडीया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरमुखसिंघ उर्फ पिंट्या भगतसिंघ रामगडीया रा.शिकारघाट आणि त्याचा मित्र दिपक रा.चिखलवाडी नांदेड या दोघांनी मिळून प्रेमसिंघचे वडील धरमसिंघ(कालू) मोहनसिंघ रामगडीया (47) यांच्यावर तलवारीने हल्ला केला. शरिराच्या अनेक भागांवर हल्ला करून त्यांचा खून केला. तक्रारीतील मजकुराप्रमाणे 7 जुलै रोजी गुरमुखसिंघने त्यांच्या दुकानातून अर्ध्या किलो चिकन खरेदी केले होते. त्याबाबतचे पैसे मागितले असता त्याने गोंधळ घातला. त्यावेळी प्रेमसिंघच्या आईने गुरमुखसिंघला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने आपल्या हातातील तलवारीने त्यांच्या आईच्या हाताच्या डाव्या अंगठ्याजवळ मारून दुखापत केली. या घटनेचा जाब विचारण्यासाठी धरमसिंघ (कालू) रामगडीया हे गुरमुखसिंघकडे गेले तेंव्हा छामनबाई रामगडीया यांच्या टीनपत्राच्या शेडमध्ये त्यांच्यावर गुरमुखसिंघने दिपकसह धरमसिंघवर हल्ला केला आणि त्यांचा खून केला. या तक्रारीप्रमाणे मुदखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 123/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 324, 323, 504, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 425 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक महेश शर्मा हे करीत आहेत.