ताज्या बातम्या

भावांचा खून करणाऱ्या दोन भावांना पोलीस कोठडी; एकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.7 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात तीन भावांनी आपल्याच सख्या बंधूचे खून केल्याचे तीन प्रकार घडले. त्यातील महादेव पिंपळगाव ता.अर्धापूर येथील मारेकऱ्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. मौैजे बेरळी(ब) ता.मुखेड येथील मारेकऱ्याला न्यायालयाने 12 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. तर दत्तमांजरी ता.माहुर येथील भावाच्या मारेकऱ्याला न्यायालयाने 10 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दत्तमांजरी ता.माहुर येथील अक्षय उत्तम राठोड यांच्या तक्रारीनुसार दि.6 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास रामेश्र्वर बाबूलाल जाधव (27) आणि त्याचे लहान बंधु ज्ञानेश्र्वर बाबूला जाधव (25) या दोघांमध्ये घरातील कुरबुरीचा वाद पेटला आणि रामेश्र्वर जाधवने आपल्या हातातील सुऱ्याने ज्ञानेश्र्वर जाधवच्या पोटात मारून जखमी केले. पोटातून खुप रक्त वाहु लागले तेंव्हा ज्ञानेश्र्वर जाधव तेथेच भारत पवार यांच्या घरासमोरील ओट्यावर बसले. कांही जणांनी त्यांना उचलून ऍटोच्या माध्यमाने दवाखान्यात नेले पण त्यांचा मृत्यू अगोदरच झाला होता. माहुर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 77/2021 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे यांच्याकडे देण्यात आला होता. आज 8 जुलै रोजी नामदेव मद्दे यांनी मारेकरी भाऊ ज्ञानेश्र्वर बाबूलाल जाधवला माहुर न्यायालयात हजर केले. न्यायाधीश पवनकुमार तापडीया यांनी ज्ञानेश्र्वर जाधवला 10 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.6 जुलै रोजी महादेव पिंपळगाव ता.अर्धापूर येथे दिगंबर अमृतराव कल्याणकर (48) याने आपला भाऊ अनिल अमृतराव कल्याणकर (45) याच्या पोटात चाकुने भोकसून त्याचा खून केला होता. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी दिगंबर अमृतराव कल्याणकरला अटक केली. आज दि.8 जुलै रोजी अर्धापूर न्यायालयाने मारेकरी भाऊ दिगंबर अमृतराव कल्याणकर यास न्यायालयीन कोठडीत पाठवून दिले आहे.
मुखेड तालुक्यातील मौजे बेरळी (ब) येथे 6 जुलै रोजी जयवंतराव गोविंदराव जुने हे आपल्या आखाड्यावर झोपले असतांना दिलीप गोविंदराव जुने याने त्यांच्या डोक्यावर दगडाने ठेचून खून केला होता. या प्रकरणी मुखेड पोलीसांनी दाखल केलेल्या खूनाच्या गुन्ह्यात दिलीप गोविंदराव जुने यास अटक केली. आज दि.8 जुलै रोजी देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी मारेकरी भाऊ दिलीप गोविंदराव जुनेला न्यायालयात हजर केले. मुखेड न्यायालयाने मारेकरी भाऊ दिलीप जुनेला 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.