

नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील वाहतूक शाखा क्रमांक एकने आज बेवारस ६७ वाहनांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.त्यातून शासनाच्या खात्यावर ३ लाख ४२ हजार रुपये जमा होणार आहेत.बोली धारकांना पैसे भरण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
आज दिनांक ७ जुलै २०२१ रोजी शहर वाहतूक शाखा वजिराबाद नांदेड यांचे कडून पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांचे मार्गदर्शनाखाली बेवारस वाहनांची लिलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी गृह पोलीस उप अधीक्षक विकास तोटावार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम,पोलीस निरीक्षण पोलीस कल्याण, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, संतोष केदासे, शहर वाहतूक शाखा पोलीस अंमलदार गंगाधर जाधव, किरण अवचार, रणजित नरवाडे, अंकुश आरदवाड, रवींद्र राठोड, अभय जाधव, सय्यद अझर, श्रीकांत वाकोडे, विष्णू कदम, सिद्धू सोनसळे, वाजीद, महिला पोलीस कअंमलदार प्रियांका कदम, सपना शिंदे, अर्चना भाकरे, ज्योती गायकवाड, दत्ता सूर्यवंशी, उद्धव पांचाळ, चाऊस मेजर इत्यादी हजर होते.
वरील सर्व वाहने हे बोली लावणारे व्यक्ती यांनी उच्चतम बोली बोलून त्या प्रमाणे खरेदी केले असून ही सर्व वाहने स्क्राब (भंगार ) मध्ये विकण्याच्या अटीवर देण्यात आले आहेत, ही वाहने पुन्हा वापरता येणार नाहीत. या वाहणांचे आर टी ओ कडील रेजिस्ट्रेशन रद्द होणार आहे. सदरची वाहने मागील चार वर्षांपासून च्या कालावधीत जमा झालेली आणि कोणीही त्यावर हक्क सांगितला नसल्याने सदरची लिलाव कार्यवाही करण्यात आली आहे.या लिलाव प्रक्रियेत एकूण १५ बोलिधारकांनी भाग घेतला होता.
एक वाहन नागपूर येथून चोरी गेलेले आहे
वाहतूक शाखेत लिलावा द्वारे विक्री करण्यात आलेली ६७ वाहने आहेत.हे सर्व ऑटो रिक्षा आहेत.यातील एक ऑटो नागपूर येथून चोरून आणलेला आहे.त्यामुळे त्या वाहनाला लिलावातुन वगळण्यात आले होते.पण नागपूर येथील पोलीस अद्याप ते वाहन घेऊन गेले नाहीत.