क्राईम

महादेव पिंपळगाव येथे भावानेच केला भावाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या सख्या भावाचा खून करणाऱ्या व्यक्तीला अर्धापूर पोलीसांनी घटना घडताच कांही तासातच ताब्यात घेतले आहे.
पिंपळगाव महादेव येथे 6 जुलै 2021 रोजी दिगंबर अमृतराव कल्याणकर (48) याने आपला सख्या भाऊ अनिल अमृतराव कल्याणकर (45) यास रस्त्यात बोलत असतांना जुन्या भांडणाच्या वादातून अगोदर शिवीगाळ केली आणि नंतर अनिल कल्याणकरच्या पोटात आणि छातीवर चाकुने वार केला. अनिल कल्याणकर रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्यानंतर सुध्दा दिगंबर कल्याणकर त्यांना मारतच राहिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक गोपाळ रांजणकर, पोलीस निरिक्षक अशोक जाधव व इतर अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी पोहचले आणि भावाचा खून करणाऱ्या दिगंबर अमृतराव कल्याणकरला ताब्यात घेतले. अनिलचे पुत्र अमोल कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे काका दिगंबर अमृतराव कल्याणकर विरुध्द अर्धापूर पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.