महाराष्ट्र

पोलीसांचे पेट्रोलपंप आजपासून जनतेसाठी खुले

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस कल्याण निधीच्या कामाचा व्याप वाढावा, त्या निधीमध्ये भर पडावी या उच्च उद्देशाने हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे पेट्रोलपंप आज पोलीसांच्या जागेत सुरू झाले.

पोलीस कल्याण निधीच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवतांना त्या योजनांसाठी एका मध्यवर्ती निधीची गरज असते. पोलीस कल्याण निधीमंडळाच्या धोरणानुसार तो निधी उभारायचा असतो. त्यातूनच पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीशी पत्र व्यवहार करून नांदेड शहरात स्नेहनगर पोलीस वसाहतीतील मोकळ्या जागेत पेट्रोल पंपाची उभारणी केली. यातून मिळणारा निधी पोलीस अंमलदारांच्या आणि त्यांच्या कुटूंबाच्या कल्याणकारी योजनांसाठी खर्च करता येईल. या पेट्रोलपंपाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे पेट्रोल उलब्ध होणार आहे. या पेट्रोलपंपावर चार मशिन बसविण्यात आल्या आहेत. त्यातील एक मशीन फक्त महिला ग्राहकांना पेट्रोल भरण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्या मशीनचे संचालन सुध्दा महिला प्रतिनिधी करतील. या पेट्रोलपंपावर वाहनातील हवा तपासणीसाठी मशीन बसविण्यात आली आहे.
या पेट्रोलपंपाचे उद्‌घाटन पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, हिंदुस्थान पेट्रोलियम सोलापूर विभागाचे उपमहाप्रबंधक सत्यनारायण चप्पा, डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ, डॉ.सिध्देश्र्वर भोरे, गृहपोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे, द्वारकादास चिखलीकर, जगदीश भंडरवार, अभिमन्यु साळुंके, अनिरुध्द काकडे, साहेबराव नरवाडे, राखीव पोलीस निरिक्षक शहादेव पोकळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर देवकत्ते, शिवाजी लष्करे, दिघे यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे, बालाजी दुबलवार, पोलीस कल्याण विभागातील पोलीस अंमलदार सुनिल पाटील, संतोष सोनसळे, क्रांती, सुषमा ईबितवार, हिंदुस्थान पेट्रोलियमच्या विक्री अधिकारी शोभीत सोनी यांनी परिश्रम घेतले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *