नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.आंबेडकरनगरमध्ये आज पिण्याच्या पाईपलाईन कामाचे उद्घाटन महापौर मोहिनी विजय येवनकर यांच्या हस्ते पार पडले. नगरसेवक संदीप सोनकांबळे यांच्या पाठपुराव्यामुळे आता डॉ.आंबेडकरनगरमधील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
आज दि.7 जुलै रोजी महापौर मोहिनी विजय येवनकर, नगरसेवक संदीप सोनकांबळे आणि डॉ.आंबेडकर नगर येथील ज्येष्ठ नागरी, महिला , युवक यांच्या उपस्थितीत पिवळीगिरणी पाण्याच्या टाकीपासून ते डॉ.आंबेडकर पाटी ते पुढे त्रिरत्न बुध्द विहार आणि त्यापुढे सुनिल मोरे यांच्या घरापर्यंत मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे डॉ.आंबेडकरनगरमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. या उद्घाटन प्रसंगी संदीप सोनकांबळे यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर आणि महापौर मोहिनी येवनकर यांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी नागरीकांनी नगरसेवक संदीप सोनकांबळे यांचा सन्मान केला.