क्राईम

समाज कल्याण विभागाकडून 28 लाख रुपये देण्याच्या आमिष दाखवणाऱ्या एक पुरूष आणि एका महिलेवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-समाजकल्याण विभागाकडून घर बांधण्यासाठी 28 लाख रुपये मिळवून देतो म्हणून 7 लाख 2 हजार रुपये घेवून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिना सुर्यकांत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैशाली हरिचरण चौडेकर ह्या आयुर्वेदिक औषधी विक्री करत होत्या. त्यांच्याकडून मिना गायकवाड ह्या औषधी खरेदी करत होत्या. त्यातून त्यांची ओळख झाली होती. त्यांच्यासोबत पुढे महादेव अप्पा शंकरअप्पा मठवाले दोघे रा.गोपाळचावडी सिडको यांचीही भेट झाली. तेंव्हा त्यांनी समाजकल्याण विभागाकडून 28 लाख रुपये कर्ज मिळवून देतो असे मिना गायकवाडला सांगितले. मिना गायकवाड यांनी महादेव मठवाले यांच्या पे फोनवर 5 हजार रुपये आणि एकूण 5 लाख रुपये दिले. तसेच वैशाली चौडेकरच्या खात्यावर मिना गायकवाड यांच्या मुलाने 97 हजार रुपये दिले. हा सर्व प्रकार 14 एप्रिल 2021 ते 5 मे 2021 दरम्यान घडला. 28 लाख रुपये कर्ज मिळाले नाही म्हणून मिना गायकवाड यांनी तक्रार दिली आहे.
भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 227/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 420,406, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे हे करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *