विशेष

वजिराबादच्या गुजराथी शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण संचालकाने दिलेल्या आदेशाची अवहेलना

नांदेड(प्रतिनिधी)-इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देतांना वयाची मर्यादा 1 ऑक्टोबर 2014 ते 31 डिसेंबर दरम्यान जन्मलेल्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुनिश्चित केल्यानंतर सुध्दा वजिराबादच्या गुजराती शाळेमध्ये बनावट पणा करून हा दिनांक पालकांना कमी करून दाखवला जात आहे. वेगवेगळ्या कामांमध्ये नामांकित असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षाचे नाव संस्थेतील कर्मचारी सांगून आपले हात सहज झटकतांना दिसतात.
सध्या कोविड कालखंडात दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया पण सुरू झाल्या आहेत. त्या प्राथमिक शिक्षण संचालक द.गो.जगताप यांनी दि.25 नोव्हेंबर 2020 रोजी जारी केलेल्या एका आदेशानुसार राज्यभरातील सर्व विभागीय शिक्षक उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद, सर्व प्रशासन अधिकारी मनपा, नपा, नप यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या वर्गात शाळा प्रवेशाचे किमान वय निश्चित करण्यात आले आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, 2017 च्या शासन निर्णयाद्वारे 31 डिसेंबर हा मानीव दिनांक घोषित करण्यात आला होता. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये जन्म घेतलेल्या बालकांना प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी फक्त शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शैक्षणिक वयोमर्यादा नव्याने निश्चित करण्यात आली आहे.
त्यानुसार इयत्ता पहिलीमध्ये 1 ऑक्टोबर 2014 ते 31 डिसेंबर 2015 दरम्यान जन्मलेल्या बालकांना पहिली वर्गात प्रवेश देण्यात यावा असे या आदेशात म्हटले आहे. काही पालकांच्या सांगण्याप्रमाणे वजिराबादच्या गुजराथी शाळेमध्ये हा मानीव दिनांक  जो प्राथमिक शिक्षण संचालकाने निश्चित केलेला आहे. तो मानला जात नाही. शाळेतील सर्व कर्मचारी अध्यक्षाकडे बोट दाखवतात. आता त्यांच्याकडे तर एक पोलीस सुरक्षा रक्षक आहे. त्याच्याकडे बंदुक असते. मग सर्व सामान्य पालक बंदुकधारी माणसासोबत असलेल्या अध्यक्षाला काय बोलेल. असा चालला आहे प्रकार गुजराथी शिक्षण संस्थेमध्ये.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.