विदेश

रस्ता अपघाताचे विश्लेशन करून त्यात कमतरता कशी येईल या प्रकल्पासाठी पोलीस उपनिरिक्षक शिवानंद स्वामी नोडल अधिकारी 

नांदेड(प्रतिनिधी)-देशात होणाऱ्या अपघातांची एकत्रित माहिती जमा करून रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालय इंटीग्रेटेड ऍक्सीडंट डाटाबेस प्रकल्प राबवते त्याद्वारे देशात  होणाऱ्या अपघातांच्या माहितीचे विश्लेषण करून अपघातांवर उपाय योजना करण्यात येते. या प्रकल्पासाठी नांदेड येथील पोलीस उपनिरिक्षक शिवानंद स्वामी हे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रकल्पाला एनआयसीचे विश्वंभर सरसर प्रमुख समन्वयक अधिकारी आहेत.
                        देशात रस्ते सुधारण्यासाठी, रस्ते अपघाताचा अचुक डाटा (माहिती) विश्लेशीत करून राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्राने (एनआयसी) मोबाईल आणि वेब ऍपलीकेशन तयार केले आहेत. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची नोंद करणे, या अपघातांची माहिती संकलीत करून अपघात कमी कसे करता येतील याची चिकित्सा केली जाते. अंतर्गत पोलीस विभागाकडून दररोजच्या नोंदी मोबाईल अप्लिकेशनवर  अपलोड केल्या जातील. त्या अपघाताच्या  घटनास्थळी भेट देणारे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळांची छायाचित्रे आणि व्हिडीओ शुटींग अपलोड करायची अशी सुविधा या मोबाईल ऍपलिकेशनमध्ये आहे. वर्ष भरात तयार होणाऱ्या अपघातांच्या माहितीची डेटा एनआरएडीच्या  ऍपलिकेशन मदतीने देशभरात होणाऱ्या अपघातांचे विश्लेषण करून त्यातील गांभीर्य कमी करण्यासाठी, अपघात संख्येत  कमी कशी होईल आणि रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी काय उपाययोजना करावी हे आयआरएडीचे प्रमुख उद्देश  आहे. या प्रकल्पाच्या मदतीसाठी नांदेड जिल्ह्यात 450 पेक्षा जास्त अधिकारी व पोलीस अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कामाला सुरळीत चालविण्यासाठी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे अपर पेालीस अधिक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शिवानंद स्वामी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *