

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या वाहतुक शाखा क्रमांक 1 ने त्यांच्याकडे असलेल्या बेवारस 67 वाहनांचा 7 जुलै, बुधवारी जाहीर लिलाव आयोजित केला आहे. जनतेने या लिलावात सहभागी व्हावे असे आवाहन वाहतुक शाखा क्रमांक 1 चे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी केले आहे.
आज रविवारी 4 जुलै रोजी जारी केलेल्या एका प्रसिध्दीपत्रकानुसार वाहतुक शाखा क्रमांक 1 ने अनेक बेवारस वाहने जप्त केली आहेत. या वाहनांची व्हिलेवाट लावण्याचे आदेश तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिल्यानंतर वाहतुक शाखेने बेवारस गाड्यांचा लिलाव आयोजित केला आहे. बेवारस असलेल्या गाड्या कांही संख्येत पोलीस मुख्यालयात आहेत आणि कांही संख्येत वजिराबाद पोलीस ठाण्यातील वाहतुक शाखेच्या कार्यालयासमोर आहेत.
या लिलावात भाग घेणाऱ्या बोलीदारांनी अनामत रक्कम व नोंदणी शुल्क या संदर्भाच्या नियम व सुचना समजून घेण्यासाठी दि.6 जुलै 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क साधायचा आहे. वाहतुक शाखेतील दुरध्वनी क्रमांक 02462 242486यावर सुध्दा कॉल करून माहिती घेता येईल. लिलावाची प्रक्रिया कोणत्याही क्षणी मागे घेण्याचे अधिकार, लिलावामधील वाहने वगळण्याचे अधिकार लिलाव समितीने राखून ठेवले आहेत.