विदेश

पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड; भारताच्या टिममध्ये महाराष्ट्राची एकमेव महिला खेळाडू

नांदेड(प्रतिनिधी) – टोकीयो येथे ऑगस्ट मध्ये होणाऱ्या पॅरा ऑलिंम्पिक स्पधैचा भारतीय संघ जाहीर झाला आहे. या संघात नांदेडची भुमीकन्या, अष्टपैलु आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातून निवड होणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे.
     नवी दिल्ली येथे दि.२९ व ३० जून रोजी पॅरा ऑलिंम्पिक स्पधेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर २४ जणांची भारतीय संघात निवड करण्यात आली. त्यातील चार महिला खेळाडू मध्ये नांदेडची भुमी कन्या भाग्यश्री जाधवचा समावेश आहे. भारतीय संघात निवड होणारी महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू आहे.
  नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री माधवराव जाधव हिने अतिशय प्रतिकूल  परिस्थितीवर मात करून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, कास्य पदकांची कमाई केली होती. त्यानंतर  सन 2019 मध्ये झालेल्या चीन येथील जागतिक पॅरा ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत तिने दोन कास्य पदके मिळऊन त्यावर भारताचे नाव कोरले होते.
  या स्पर्धेत सहभागी झालेली ती महाराष्ट्रातील एकमेव दिव्यांग खेळाडू होती.
२०२१मध्ये दुबई येथे झालेल्या फाजा पॅरा अथेलेटिक्स ग्रँड प्रिक्स या जागतिक स्पर्धत देखील तिने गोळाफेक मध्ये रौप्यपदक तर भालाफेक या क्रिडा प्रकारात तिने कास्य पदक मिळऊन भारताची शान राखली होती.
 ऑलिंम्पिक व एशियन क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे तिचे तिचे स्वप्न होते. खांद्याला जबर दुखापत झालेली असताना देखील तिचा  स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे.
आर्थिक परिस्थितीवर मात करीत  यशोशिखर गाठण्यासाठी तीचे जीवापाड प्रयत्न सुरू आहेत.  गोळाफेक या क्रीडा स्पर्धेत  एफ ३४ या वर्गवारीत ती पॅरा ऑलिंम्पिक स्पधेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
येत्या ऑगस्ट मध्ये टोकियो मध्ये ऑलिंम्पिक नंतर पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धा होणार आहेत. या जागतिक क्रीडा स्पर्धेत आपण भारताच्या तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवीत पदकाची कमाई करू,असा आत्मविश्वास तिने बोलून दाखवला आहे.
  आपल्या क्रीडा  जीवनातील  अंतिम ध्येय गाठण्यासाठी माझे मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण सर, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे, माजी आ. बापु साहेब गोरठेकर, हिंगोलीचे जिल्हा नियोजन अधिकारी रामदास पाटील, विवांश जीमचे अनिल पाटील भालेराव, मातोश्री गर्ल्स हॉस्टेलचे सुधीर पाटील,  प्रलोभ कुलकर्णी यांचे नेहमीच सहकार्य लाभले अशी कृतज्ञता व्यक्त केली.
    मराठी बाणा देशपातळीवर गाजवणाऱ्या या महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवणाऱ्या या नांदेडच्या भुमी कन्येचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *