नांदेड

आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी एकाच दिवसात केला दोन कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ

नांदेड(प्रतिनिधी) – नांदेड दक्षिण मतदार संघातील महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्र. 19 मधील कोैठा, असर्जन आदी भागात आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी दोन कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ केला. या प्रभागातील जवळपास 22 ठिकाणी भुमीपुजन, नारळ फोडण्यात आले. तसेच येत्या 15 दिवसात ही कामे पुर्ण होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.


नांदेड दक्षिण मतदार संघात दलितोत्तर वस्ती नगर विकास अंतर्गत मुलभूत विकास कामासाठी 4 कोटीं मंजूर करण्यात आले आहेत तसेच आमदार निधीतून 70 लाख रुपये मंजूर झाले आहेत. नगर विकास अंतर्गत मुलभूत विकास कामांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी 2 कोटींच्या कामांचा शुभारंभ कौठा येथील नरोबा मंदिर येथे आरती केल्यानंतर आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी आज केला. विशेष म्हणजे प्रभाग क्र.19 मधील असर्जन व कौठा भागात आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी मोटारसायकलवर प्रभागाची पाहणी केली. त्यानंतर आज या प्रभागातील जवळपास 22 ठिकाणी विकास कामाचा शुभारंभ केला. या विकास कामांतर्गत सी. सी. रस्ता व नाल्यांचे बांधकाम होणार आहे. त्याचबरोबर असर्जन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. अशा सुचना त्यांनी उपस्थित गुत्तेदारांना केल्या. ही सर्व कामे गुरू रामदास आणि प्रविण कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. केवळ विकास कामांचा शुभारंभ नव्हे तर यावेळी आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी उपस्थिात नागरिकांच्या समस्या ऐकून त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. प्रभागात तब्बल 4 वर्षानंतर आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांच्या पुढाकाराने कामे होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक राजू काळे, दिपाली मोरे, चित्रा गायकवाड, संजय मोरे, सिध्दार्थ गायकवाड, शंकर स्वामी, शंकर जाधव, धुमाळ पाटील ,वैद्य पाटील,जाधव पाटील,बालाजी उप्पे,कैलास खियांनी,आर टवार साहेब,माणिकराव काकडे,रुकमाजी लाबदाडे,कुरुडे सर,पावडे,जाधव,नितीन सुर्यवंशी, भोसले सर,रितेश बिसेन,झोळगेसर,ठाकूर सर,उतरवार सर ,बेरुळकर साहेब,रेंगुटवार,काटकर सर,बाहेती, धुमाळवाडी,असर्जन कैम्प बसवेश्वर नगर ,वृंदावन नगर ,कपलेश्वर नगर आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . दरम्यान पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शाखाली व आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांच्या प्रयत्नामुळे नगरसेवक राजू काळे यांनी या कामांसाठी पाठपुरावा केला.


या विकास कामांविषयी आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांना विचारले असता पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नांदेड शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे हे स्वप्न असून यासाठी त्यांनी 59 कोटींची कामे मंजूर केली आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नगरविकास अंतर्गत 5 कोटींच्या कामांपैकी 2 कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ आपण केला आहे. ही कामे येत्या 15 दिवसात पूर्ण होतील आणि अन्य विकास कामे दोन ते तीन महिन्यात पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *