क्राईम

फक्त ४८ तासात चोरी झालेला ट्रक विमानतळ पोलिसांनी पकडला; कोरोना पीडित महिलेला न्याय मिळवून दिला

नांदेड,(प्रतिनिधी)- विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच ४८ तासात चोरी गेलेला ट्रक जप्त करून १०० टक्के जप्तीचे काम केले आहे.
     नाथनगर परिसरातून दिनांक १० ते ३१ डिसेंबरच्या रात्री आपला ट्रक क्रमांक एमएच २६ एडी ०७९६ चोरीला गेला आहे. अशी तक्रार ट्रक मालकीण जयश्री शिवराज बुरपले यांनी दिनांक १ जुलै रोजी दिली.विमानतळ पोलिसांनी गुन्हा क्रमांक २००/२०२१ भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ प्रमाणे दाखल केला.
अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी.जाधव,पोलीस उप निरीक्षक महेश ठाकूर,पोलीस अंमलदार बाबा गजभारे,दारासिंग राठोड,कानगुले,कलंदर आणि गंगवारे यांच्या पथकाने हा ट्रक कुंटूर येथून ताब्यात घेतला आहे.जयश्री बुरपले या कोरोनाने पीडित महिलेला न्याय मिळवून दिला आहे. हा ट्रक युवराज गोविंद बुरपले (३०) याने चोरून नेला होता. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे.स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी विमानतळ  पोलिसांचे कौतुक केले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *