नांदेड(प्रतिनिधी)-लहान बालकांच्या भांडणाचे रुपांत्तर भयंकर हाणामारीमध्ये झाले आणि त्यातून चार जणांविरुध्द खून करण्याचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल झाला आहे.
शेख उमर शेख मुजीब रा.समीराबाग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.30 जूनच्या दुपारी 3 वाजता लहान बालकांच्या खेळण्यावरून तयार झालेले भांडण मोठ्या लोकांमध्ये आले आणि शेख सलीम शेख महेताब, खमरुम इस्लाम शेख सलीम, अब्दुल गणी शेख सलीम, शेख रमजान शेख सलीम या सर्वांनी मिळून शेख खाजा अब्दुल खाद, शेख उमर शेख मुजीब यांच्यावर तलवारी, लोखंडी रॉड आदीने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू होवू शकला असता. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम 307, 324, 323, 504, 506, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 210/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदाडे हे करीत आहेत.
