महाराष्ट्र

पोलीसांच्या कुटूंब आरोग्य योजनेत समस्या निराकरणासाठी त्रयस्त पक्षाची नेमणूक

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस कल्याण आरोग्य योजनेअंतर्गत पोलीसांना उपचार घेतांना किंवा उपचारानंतर समोर येणाऱ्या अडचणी सोडवतांना सुविधा मिळावी म्हणून पोलीस महासंचालक कार्यालयाने 3 जणंाची एक समिती स्थापन केली आहे. राज्यातील पोलीस या समितीसोबत संपर्क साधून आपल्या अडचणी सोडवून घेवू शकतील असे महत्वाचे परिपत्रक प्रशासन विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी जारी केले आहे.
राज्यभरात पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजनेअंतर्गत त्यांच्या पॅनलवर असलेल्या दवाखान्यात उपचाराकरीता दाखल होतांना आणि उपचार झाल्यानंतर येणाऱ्या समस्या आणि अडचणी सह सोडवता याव्यात म्हणून त्रयस्त पक्ष, मेडी असिस्ट हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रा.लि.मुंबई यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या आस्थापनेवरील डॉक्टर्स व व्यवस्थापक यांच्यासोबत पोलीस विभागातील अधिकारी आणि पोलीस अंमलदार थेट संपर्क साधून आपल्या आरोग्य उपचारासंदर्भाने मार्गदर्शन घेवू शकतील. या समितीने पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर पोलीसांनी पोलीस महासंचालक कार्यालयात संपर्क साधावा असे या परिपत्रकात लिहिले आहे.


पोलीसांच्या अडचणी सोडविण्यासाठी डॉ.सनी पेंडणेकर-प्रोजेक्ट हेड मोबाईल नंबर 9867688887, डॉ.विनय जाधव मो.नं.7400084512 आणि प्रविण भैलुमे-व्यवस्थापक मो.नं.8108222952 आणि 8828122787 यावर सोमवार ते शनिवार सकाळी 9.30 ते 6.30 या वळेत संपर्क साधता येईल. सोबतच प्रविण भैलुमे यांचा मो.नं. 8828122787 यावर आठवड्यातील 7 दिवस आणि 24 तास संपर्क साधता येईल.
अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी आरोग्य विषयक दिलेल्या या सुचना संबंधीत पोलीस घटक प्रमुखांनी प्रत्येक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना प्राप्त होईल याप्रमाणे तसेच त्रयस्थ पक्षाचे मोबाईल नंबर सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळतील असे करायचे आहे. त्रयस्थ पक्षाने पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे आरोग्य विषयक समाधान केले नाही, प्रतिसाद दिला नाही तर पोलीस महासंचालक कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक 022-22021680 एक्सटेंशन क्रमांक 239 वर कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आपली समस्या दुर करून घ्यावे असे सांगण्यात आले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *