नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 52 पत्यांचा जुगार सुध्दा चालतो हे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंमलदाराने टाकलेल्या छाप्यानंतर सिद्द झाले.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार प्रमोद गोविंदराव कऱ्हाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 जूनच्या मध्यरात्री 11 वाजेच्यासुमारास वाजेगाव ते चंदासिंग कॉर्नर या रस्त्यावरील शेख फारुख यांच्या इमारती शेजारी मोकळ्या जागेत शेख मोबीन शेख फारुख (22) रा.उमर कॉलनी, मोहम्मद आसीफ मोहम्मद युसूफ रा.खुदबईनगर चौरस्ता, शेख मुख्तार शेख अमीर (24)रा.उमर कॉलनी, मोहम्मद वसीम मोहम्मद रफीयोद्दीन (25)रा.खुदबईनगर चौरस्ता, मोहम्मद सादेक मोहम्मद सलीम (21) रा.हमीदिया कॉलनी, ताहेर अली मुख्तार अली (25)रा.उमर कॉलनी, शेख शादाब शेख हबीब (20) रा.उमर कॉलनी, मोहम्मद आसीफ अब्दुल गणी (27) रा.उमर कॉलनी, शेख जावेद शेख गफार (25) रा.उमर कॉलनी, शेख जाकेर शेख जकीर (26) रा.मिलतनगर आणि आसिफ खान प्यारे खान (25) रा.चौफाळा अशा 11 जणांना पकडले. हे सर्व जुगारी बदक छाप पत्ते घेवून तेथे तिरट नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्याकडून 20 हजार 160 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
