नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद शहरातून एक 24 वर्षीय युवक घरातून न सांगता 1 जुलै रोजी निघून गेला आहे. धर्माबाद पोलीसांनी या युवकाच्या शोधासाठी शोध पत्रिका जारी केली आहे.
लक्ष्मण शंकरराव साळवी मुळ रा.राजस्थान ह.मु.कारेगाव फाटा धर्माबाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 जून रोजी त्यांच्यासोबत राहणार त्यांचा भाऊ अर्जुन शंकरराव साळवी (24) हा कोणास कांही न सांगता घरातून निघून गेला आहे. या बाबतची माहिती लक्ष्मण साळवी यांनी 1 जुलै रोजी धर्माबाद पोलीसांना दिली. धर्माबाद पोलीसांनी या बाबत मिसींग क्रमांक 10/2021 दाखल केला आहे. या मिसिंग प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार एस.ए.आडे हे करीत आहेत.
पोलीसांनी या युवकाच्या शोधासाठी शोध पत्रिका जारी केली असून त्यानुसार या घरातून निघून गेलेल्या अर्जुन शंकरराव साळवीचे (वय 24) आहे. रंग गोरा आहे. उंची 6 फुट आहे. शिक्षण 4 थी पर्यंत झाले आहे. बांधा सडपातळ आहे. त्यांने काळ्या रंगाचा टीशर्ट आणि नाईट पॅन्ट परिधान केलेली आहे. त्याला हिंदी आणि राजस्थानी भाषा बोलता येतात. धर्माबादचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या वर्णनाचा युवक कोणाला दिसला, त्याबद्दल कांही माहिती असेल तर त्यांनी धर्माबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि माहिती द्यावी. पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांचा मोबाईल क्रमांक 9821159844 आणि एस.ए.आडे यांचा मोबाईल नंबर 9552060875 यावर सुध्दा माहिती देता येईल.