नांदेड (प्रतिनिधी)-भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने शेअर्सची किंमत न वाढवता सभासदावर आर्थिक बोजा न टाकता नविन सभासद (नियमित ऊस पुरवणारे) करून भागभांडवल जमा करावे अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले व लहानचे सरपंच सदाशीव इंगळे यांनी केली.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना स्थापन करतेवेळेस काही कारणांमुळे मुख्य प्रवर्तक अशोकराव चव्हाण यांना अनेक गावातील लोकांना सभासद करून घेता आले नाही त्यामुळे लहान पारडी शेलगाव यासह अनेक गावांतील साहेबांचे विश्वासू कार्यकर्तेही वर्षांनुवर्षांपासून नाराज आहेत. आता सध्या कारखान्याला आर्थिक भांडवल भाग भांडवलाची गरज निर्माण झाल्याने कारखाना प्रशासनाने दहा हजारांऐवजी पंधरा हजार रूपयांचा शेअर्स करण्याचा निर्णय घेतला मात्र यामुळे शेतकर्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. एक तर दोन कारखाने विकूनही यावर्षी अगोदरच पूर्ण एफआरपी नाही, त्यात पुन्हा पाच हजार रूपये द्यायचे म्हटले तर कुठून द्यावे असा प्रश्न सभासदांना पडलेला आहे त्यामुळे कारखाना प्रशासनाने त्यांचा हा तुघलकी निर्णय मागे घ्यावा व पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाणांनी नियमित ऊस पुरवठा करणारे शेतकरी, सभासद न करून घेतलेले शेतकरी, यांना नवीन सभासद करून घ्यावे व बिल्कुल भागभांडवल उभे करावे असे झाल्यास शेतकरीही मोठय़ा आनंदाने भागभांडवल जमा करतील व जुन्या सभासदावर आर्थिक बोजा पडणार नाही म्हणून कारखाना प्रशासनाने आर्थिक संकटाच्या काळात जुन्या सभासदांना वेठीस न धरता नवीन लोकांना सभासद करून घेतल्यास राहिलेल्या लोकांनाही कारखाना व साहेब आपले वाटतील व आर्थिक भांडवली जमा होईल करिता म्हणणे पालकमंत्र्यांनी याबाबत लोकभावनेचा विचार करावा व नवीन लोकांना कारखान्याचे सभासद होण्याची संधी द्यावी अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले, लहानचे सरपंच सदाशिव इंगळे यांनी केली आहे.
