नांदेड(प्रतिनिधी)-आज 1 जुलै रोजी वसंतराव नाईक जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली. अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून वसंतराव नाईक यांना अभिवादन केले.
याप्रसंगी गृह पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे, नियंत्रण कक्षाचे सुनिल निकाळजे, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखा, जिल्हा विशेष शाखा, नियंत्रण कक्ष येथील अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदार या प्रसंगी उपस्थित होते. जनसंपर्क कार्यालयातील उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे, रेखा इंगळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
