नांदेड(प्रतिनिधी )-राज्याचे माजी तंत्र शिक्षणमंत्री तथा साईबाबा संस्थान शिर्डीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य डी. पी. सावंत यांचा वाढदिवस दि. 1 जुलै विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
शहर जिल्हा युवक कॉंग्रेसचे महासचिव हंसराज सुभाष काटकांबळे यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रामनगर, हनुमानगढ येथील सुमन मुलींचे बाल सुधारगृह येथे सकाळी 11 वाजता अन्नदान करण्यात आले. तर दुपारी 1 वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे ज्येष्ठ महिलांंना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माजी जि. प. उपाध्यक्ष समाधान जाधव,नांदेड कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ऍड. निलेश पावडे, अर्धापूर कॉंग्रेस मागासवर्गीय सेलचे माजी तालुकाध्यक्ष सोनाजी सरोदे, युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक संदीप सोनकांबळे, नगरसेवक महेंद्र पिंपळे, नांदेड पंचायत समितीचे माजी सभापती सुखदेव जाधव, कॉंग्रेस कमिटी मागासवर्गीय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिल्पा नरवाडे, युवक कॉंग्रेसच्या महासचिव सुषमा थोरात, युवक कॉंग्रेसचे महासचिव सत्यपाल सावंत, कॉंग्रेस कमिटीचे सचिव नागेश सुलगेकर, सोशल मिडीयाचे शहर जिल्हाध्यक्ष हरजितसिंघ संधू, युवक कॉंग्रेसचे महासचिव तुषार पोहरे लहानकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्यामराव वाघमारे, गंगाधर वडणे, व्ही. एस. कदम, कॉंग्रेस कमिटी मागासवर्गीय विभागाचे संजय वाघमारे, एनएसयुआय कॉंग्रेसचे महासचिव निखील बनसोडे, कल्पना वंदणे, कल्पना काटकांबळे, वंदना मोगले, रोहण कांबळे, कॉंग्रेसचे चिटणीस सुभाष काटकांबळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवीदास वाघमारे, तथागत काटकांबळे, कपिल जोंधळे, शुभम वाघमारे, रवि देसराज, मुन्ना गायकवाड, युवनाथन चव्हाण, साई देसराज, भय्या जोंधळे, प्रफुल्ल कांबळे, मनोज हाटकर, राहुल वंदणे, बबलु जोंधळे आदींनी परिश्रम घेतले.