नांदेड

“गाव आदर्श “करण्यासाठी युवकांनी समोर यावे -सौ वर्षा ठाकूर

नवीन नांदेड(प्रतिनिधी)–गावाच्या सर्वांगीण विकास करताना गावाची स्वच्छता ,हगणदारी मुक्त गाव ,शिक्षण व आदर्श शाळा ,अंगणवाडी ,शासकीय रुग्णालय ,यासह वृक्षवल्लीने नटलेले गाव हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते . अशा प्रकारचे आदर्श गाव करण्यासाठी गावातील युवक -युवतीने समोर येऊन गावाचा सर्वांगीण विकासा करण्यासाठी पुढे येण्याचे गरज आहे. जर युवकांनी यात पुढाकार घेतला तर त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची इच्छा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर यांनी धनेगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केला, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पेयजल कुंभाचे पाणी वितरणाचे उदघाटन केले.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्यावतीने धनेगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे पाणी पुरवठा व जलसंधारणच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन दि ३० जून रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून जि .प .चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी ,वाजेगाव जि ‌.प .सदस्य मनोहर शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे शास्त्री ,सरपंच गंगाधर [पिंटू ] पाटील शिंदे ,जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका विजयाताई शिंदे ,धारोजीराव हंबर्डे ,पंचायत समिती उपसभापती प्रतिनिधी अब्दुल फहीम ,भुजंगराव भालके ,ग्रामविकास अधिकारी व्ही पी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. यावेळी धनेगाव येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून सात लक्ष लिटर जलकुंभ उभारण्यात आले .या जलकुंभातुन नागरिकांना पाणी वितरण सौ वर्षा ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले .यावेळी वाजेगाव जि.प सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी प्रास्ताविकात जलशुद्धीकेंद्राला सरक्षण भिंत ,येणारा रस्ता व येथील अपुरे कर्मचारी यासह धनेगाव ,तुप्पा ,बळीरामपूर ,वाजेगाव पाणी पुरवठा योजनेतील आकारण्यात आलेल्या रक्कमेवरचे व्याजमाफी करण्यात यावे अशी मागणी केली. यास तत्वता:मान्यता सौ वर्षा ठाकूर यांनी दिली .
यावेळी वृक्षारोपण व झाडाचे संगोपण करणाऱ्या चंदू रायबोळे ,थंडेकर मामा ,शामबाई वाघमारे ,अनुसयाबाई वाघमारे या कामगारांचा सत्कार केला,त्यानंतर त्यांनी मानवी शरीराला ऑक्सिजन पुरवठा करणारे वड ,पिंपळ ,लिंब यासह १००वृक्षांचे वृक्षारोपण वर्षा ठाकूर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना वर्षा ठाकूर म्हणाल्या ,कोव्हीड काळात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला या गोष्टीची जण ठेवत प्रत्येक नागरिकांनी आपल्या वाढदिवसाला एक ऑक्सिजन वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे ,ग्रामपंचायतीने आपल्या परिसरात स्वच्छता ,वृक्ष लागवड आदर्श शाळा ,आरोग्य केंद्र याचा विकास साधला पाहिजे .तरच प्रत्येक गाव हिवरे बाजार होईल यासाठी गावातील प्रत्येक युवक -युवतीने आदर्श गावासाठी पुढे येऊन कार्य करण्याची गरज आहे. तरच प्रत्येक गाव “आदर्श गाव” होईल यासाठी जिल्हा परिषद सदैव मदत करीन असे मी वचन देते असे त्या वेळी बोलताना म्हणालेे.
यावेळी जि प चे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता शास्त्री ,ए. डी. लव्हेकर ,सौरभ खाडे ,ए .एन .जोशी ,के जी पामपटवार ,माजी सरपंच दिलीप गजभारे .रमेश वाघमारे ,नितीन पाटील शिंदे यांची उपस्थिती होती.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *