महाराष्ट्र

अर्धापुरात उसळलेली दंगल अश्रुधुराच्या नळकांडीने थांबली; व्यायामशाळेतून रस्तावर आलेला प्रकार

नांदेड,(प्रतिनिधी)- व्यायामशाळेत व्यायाम करता करता भांडण झाले आणि त्या भांडणाने सार्वजनिक रूप घेतल्या नंतर दंगल घडली.अर्धापूर पोलिसांनी हवेत एक गोळी उडवली,एक रबरी गोळी उडवली आणि नंतर अश्रुधुराची नळकांडी फोडली तेव्हा कोठे जमाव पांगला.सध्या अर्धापुरात तणावग्रस्त शांतता आहे.पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी सार्वजनिक शांततेस बाधा पोहचवणाऱ्याना गुन्हेगारांना  कदापी सोडणार नाही असे सांगितले आहे.

                            काल दिनांक ३० जून रोजी अर्धापूर शहरात नांदेड रस्त्यावर असलेल्या एका खाजगी व्यायामशाळेत अनेक युवक व्यायाम करीत असतांना एका युवकाचे दुसऱ्या युवकांसोबत भांडण झाले. तेथे एका गटाच्या युवकांची संख्या जास्त होती.अश्या परिस्थिती एकटा युवक इतर युवकांच्या गटाचा बळी ठरला.नंतर चोप बसलेला युवक अर्धापूर गावात गेला आणि आपली टोळकी घेऊन परत व्यायामशाळेकडे निघाला. पण त्याला चोप देणारी टोळके जुन्या अर्धापूर  गावातील मारोती मंदिरा जवळच भेटले आणि सुरु झाली दंगल.दोन्ही टोळके आपसात हाणामाऱ्या करून घेत होते. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी राडा करून ४ चारचाकी गाड्या आणि २ दुचाकी गाड्यांची नासधूस केली.तेव्हा पोलीस निरीक्षक अशोक जाधव,पोलीस उप निरीक्षक कपिल आगलावे आणि इतर पोलीस अंमलदार तेथे पोहचले.सार्वजिनक घोष पद्धतीने पोलिसांनी दोन्ही गटांना शांतता राखण्यास सांगितले. पण दगलखोरांवर काहीही प्रभाव पडला नाही.तेव्हा कपिल आगलावे यांच्या पिस्तुलातून एक गोळी हवेत झाडण्यात आली.एक रबरी गोळी झाडण्यात आली. त्या नंतर पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उप अधीक्षक बाळासाहेब देशमुख,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह अनेक अधिकारी,पोलीस अंमलदार, क्यूआरटीचे आणि आरसीपीचे जवान अर्धापुरात दाखल झाले.
                           दंगलखोरांनी विद्युत पुरवठा खंडित करून पुन्हा दंगल सुरूच ठेवली. त्यात अर्धापूर पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. तेव्हा पोलिसांनी अश्रुधुराची   एक नळकांडी फोडली आणि त्यांनतर दंगलखोर राना रानाने पळू लागले.पोलीस उप निरीक्षक कपिल आगलावे यांच्या तक्रारीवरून दंगलखोरांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७,३५३ सह अनेक कालमानवये गुन्हा दखल करण्यात आलं आहे.अर्धापुरात सध्या तणावात पण स्मशान शांतता पसरली आहे.पोलिसानी मोठा फौजफाटा अर्धापुरात तैनात केला आहे. दंगलखोरांपैकी तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली आहे.
सकाळीच पोलीस अधीक्षक अर्धापुरात 
रात्री चार वाजता नांदेडला परत आलेले पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे १ जुलैची सकाळ होताच पुन्हा अर्धापुरात दाखल झाले आहेत. त्यांची हि पद्धती बरोबरच आहे. कारण  झालेल्या एका प्रकारातून पोलीस अधिक्षकांचे आदेश आहेत असे सांगून जनतेची दिशाभूल करण्यात आली होती.आता सर्वच परिस्थिती स्वतः पाहणार आणि स्वतः आदेश देणार अशी प्रमोद कुमार शेवाळे यांची तयारी असेल.अर्थात आपल्या आणि जनतेच्या मध्ये कोणी मध्यस्थी ठेवला नाहीतरच सर्व काही छान होईल.नाहीतर पुन्हा एकदा सूर्याजी पिसाळांना संधी मिळेल आणि कारभार वेगळ्याच दिशेला जाईल. पोलीस उप महानिरीक्षकांनी सुद्धा स्वतः सर्व पाहावे,ओळखावे नाहीतर कोणाच्या सांगण्यावरून  कोणाला परभणी,लातूर किंवा हिंगोलीला पाठवण्याची वेळ येणार नाही. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *