नांदेड(प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची खबर होईल असा शासन निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने आज दि. 30 जून रोजी जारी केली आहे. या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील 5 समान हप्त्यामधील दुसरा हप्ता देण्याचा निर्णय देण्याचा शासनाने घेतला आहे. या शासन निर्णयावर वित्त विभागाचे उपसचिव इंद्रजित गोरे यांची डिजीटल स्वाक्षरी आहे.
शासनाने आज जाहीर केलेल्या या शासन निर्णयानुसार वित्त विभागाच्या सहा जुन्या निर्णयांचा संदर्भ देऊन हा निर्णय घेतला आहे. 30 जानेवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगाच्या निर्देशानुसार त्या वेळेस थकबाकी सन 2019-20 या आर्थिक वर्षांपासून पुढील पाच वर्षांत समान पाच हप्त्यामध्ये सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेत जमा करण्याचा निर्णय झाला होता. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हे सातव्या वेतन आयोगाचे थकीत वेतनाचे पाच हप्ते रोखीने देण्याचा निर्णय झाला होता. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना ही वेतनाची थकबाकी रक्कम पाच समान हप्त्यांमध्ये रोखीने देण्यात यावी असे शासन परिपत्रक 30 मे 2019 रोजी जारी झाले होते. असाच निर्णय निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना समान हप्त्यांमध्ये रोखीने देण्यात यावा असा निर्णय सन 2019 मध्ये झाला होता.
राज्यात डिसेंबर 2019 पासूनच कोवीड विषाणूच्या साथीमुळे उद्भवेली परिस्थिती आणि राज्याच्या महसुली जमेवर झालेला प्रतिकुल परिणाम 1 जुलै 2020 रोजी सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रदान एक वर्षाने पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे उद्या दि. 1 जुलै 2021 रोजी सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता देयदार आहे. तरी पण शासनाने दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याची परिस्थिती गंभीर असताना सुद्धा शासनाने हा घेतलेला निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांना आनंद देणारा आहे.
1 जुलै 2020 रोजी देय असलेलया सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता भविष्य निर्वाह योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या योजनेत जमा करून देण्यात येणार आहे. अथवा रोखीने पण देता येईल. निवृत्त वेतन धारकांना थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम जुलै 2021 च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येईल. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीतील दुसरा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्यात येईल. सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व अनुदानित संस्थामधील पात्र कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम सप्टेंबर 2021 च्या वेतनासोबत मिळणार आहे.
भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा हा हप्ता त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेत जमा करण्यात येईल.राष्ट्रीय निवृत्त वेतन अथवा परिभाषिक अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकीचे रक्कम रोखीने मिळणार आहेत. दि. 1 जून 2020 ते आज दि. 30 जून 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेले आणि मरण पावलेले कर्मचारी यांच्या वेतनाचा थकबाकीचा दुसरा हप्ता रोखीने मिळेल. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या हप्त्यावर दि. 1 जुलै 2020 पासून व्याज मिळेल. भविष्य निर्वाह निधी योजनेत जमा करण्यात आलेली दुसऱ्या हप्त्याची रक्कम 1 जुलै 2020 पासून दोन वर्षे अर्थात 3 जून 2022 पर्यंत काढता येणार नाही.
आजच्या कोवीड परिस्थितीमध्ये 1 जुलै 2020 रोजी देय असलेला सातव्या वेतन आयोगातील थकबाकीचा तिसरा हप्ता देण्याचा निर्णय सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे. तो तिसरा हप्ता देण्याचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमीत होणार आहेत. राज्यशासनाने जारी केलेला हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202106301707286705 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध सुद्धा केला आहे.

Post Views:
443