नांदेड(प्रतिनिधी) -सध्याच्या परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याला लक्ष करून ग्रीन सिटी सोसायटीने कोविड नियमांचे पालन करत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम 27 जून रविवारी आयोजित केला होता.
ग्रीन सिटी सोसायटीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन गोटालपांजरी गावात गेले. या प्रसंगी 50 वेगवेगळ्या जातींच्या औषधींचे वृक्ष आणि जास्त सावली देणारे वृक्ष वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार घेतला. याप्रसंगी गोटालपांजरीचे सरपंच सचिन इंगळे, ग्राम पंचायत सदस्या प्रियंका पाटील आणि आकाश पिसार सोसायटीचे अध्यक्ष मुकूंद भट, सचिव पुनित भगत, पत्रकार चंद्रकांत बरवे, दिलीप शिरभाते, किशोर डाखोडे, साईल नागपूरे, रामदास खवशी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक लोभाजी सावंत, खुशाल राऊत, बळीराम जाधव, मेघा चिटगोपेकर, राजेंद्रसिंह राणे, प्रणय गोंडाने, मनोज स्वान, सचिन वालदे, दिनेश वानखेडे, संगीता दाबेराव आणि प्राजंली जाधव यांनी नियोजनपुर्वक केले होते.
