नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस उपनिरिक्षक आणि 15 पोलीस अंमलदारांना आज सेवानिवृत्तीनंतरच्या निरोप देतांना पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे यांनी त्यांना भविष्यातील जीवनासाठी शुभकामना दिल्या.
आज दि.30 जून रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस उपनिरिक्षक आणि 15 पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले आहेत. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यावतीने आज विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे आणि पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे यांनी या सर्व सेवानिवृत्त पोलीसांना सपत्नीक सत्कार करून त्यांना शुभकामना दिल्या.
सेवानिवृत्त झालेले पोलीस पुढील प्रमाणे आहेत. पोलीस उपनिरिक्षक यादव केरबाजी जांभळीकर(कंटूर), नागनाथ चंदरराव सुर्यतळ(मरखेल), पोलीस अंमलदार शेख अमीरोद्दीन अब्दुल कादर(तामसा), साहेबराव गणपतराव दवणे(लिंबगाव), विनायक गंगाधर तिडके(माळाकोळी), प्रेमसिंघ धरीया राठोड(माहूर), गंगाधर दशरथराव पाईकराव(नायगाव), अरुण खिरसिंग राठोड(जिल्हा विशेष शाखा), विजय गोविंद कंधारे(बिनतारी संदेश विभाग), मानकी रामजी अत्राराम, माधव लक्ष्मण इसानकर, गौतम बालाजी कांबळे, अब्दुल वाहेद गुलाम जिलानी, बालाजी व्यंकटी शिंदे, अशोक महादेव पांचाळ, नथु गंगाराम भोसले( सर्व पोलीस मुख्यालय) असे आहेत.
कौटूंबिक स्वरुपाचा हा निरोप समारंभ पोलीस अधिक्षक कार्यालयातील सभागृहात पार पडला. याप्रसंगी सर्व सेवानिवृत्त पोलीसांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल एकनाथराव कत्ते यांनी केले. महिला पोलीस कल्याण विभागाच्या राखी कसबे यांनी परिश्रम घेत या कार्यक्रमाचे नियोजन केले.
