क्राईम

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी व एक मोबाईल चोरी

लिंबगाव येथे जबरी चोरी, हदगाव येथे जबरी चोरी, इतर दोन दुचाकी चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-मौजे वाघी तांडा येथे तीन चोरट्यांनी एक जबरी चोरी केली आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सुध्दा उपलब्ध आहेत. दत्तबर्डी रस्ता हदगाव येथे एका व्यक्तीकडून बळजबरीने रोख रक्कम काढून घेतली आहे. धर्माबाद आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. तसेच कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड यांच्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या आणि एक मोबाईल चोरीला गेला आहे. या सर्व चोरी प्रकरांमध्ये मिळून 1 लाख 77 हजार 200 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
आदेश धोंडीबा हणमंते हे 20 वर्षीय युवक 28 जूनच्या रात्री 11 वाजेच्यासुमारास वाघी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ थांबले असतांना तीन जण आले आणि त्यांनी त्यांना चाकूने उजव्या पायाच्या मांडीवर मारुन जखमी केले. चोरट्यांनी त्यांचा आणि त्यांच्या भावाचा असे दोन मोबाईल बळजबरीने चोरून घेतले आहेत. लिंबगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक केंद्रे अधिक तपास करीत आहेत. या घटनेत चोरी करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज सुध्दा उपलब्ध आहेत.
भारत लोभाजी तावडे हे 29 जून रोजी मध्यरात्रीनंतर 2 वाजता दत्तबर्डी, हदगाव येथून देवदर्शनासाठी जाऊन परत येत असतांना कांही चोरट्यांनी त्यांची मोटारसायकल रोखून त्यांच्या खिशातून बळजबरीने 3200 रुपये काढून घेतले आहेत. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमदार लोखंडे अधिक तपास करीत आहेत.
लाल अहेमद मिरासाब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 जूनच्या रात्री 10 ते 10.50 या 50 मिनिटाच्या वेळेत त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.टी.3762 ही 50 हजार रुपये किंमतीची गाडी धर्माबाद रेल्वे स्थानकासमोरून चोरीला गेली आहे. धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मसलेकर अधिक तपास करीत आहेत.
विनायक डोमाजी वडजे यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक शक्तीनगर नांदेड येथे 25 जूनच्या रात्री 9 वाजता उभी केली होती. 26 जुनच्या सकाळी 6 वाजेदरम्यान ही 10 हजार रुपये किंमतीची गाडी क्रमंाक एम.एच.26 पी.1088 चोरीला गेली आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गोरे हे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीणचे कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांच्याकडे प्रभारी पद असलेल्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गजेंद्रसिंघ दरबारसिंघ पत्रे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एन.3744 ही 28 जून रोजी दुपारी 3 ते रात्री 10 च्या वेळेदरम्यान चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 35 हजार रुपये आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.
गोविंदप्रसाद हरीप्रसाद सारडा यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एल.2572 ही विकासनगर जुना कौठा येथे आपल्या घरासमोर 17 जून रोजी रात्री 10 वाजता उभी केली होती. 18 जूनच्या सकाळी 7 वाजेदरम्यान ही 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
29 जून रोजी दुपारी 4 वाजता जुना कौठा परिसरात साई कमानजवळ रमेश बाबाराव भोसले आणि त्यांचे मित्र भाजीपाला खरेदी करीत असतांना त्यांचा 20 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुनकमवार अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.