शिक्षण

मानवी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जनतेचे संरक्षण करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस तयार

नांदेड(प्रतिनिधी)-नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीमध्ये मदत करतांना आपला जीव धोक्यात आहे हे माहित असतांना सुध्दा मदत करावी लागते. असे एक प्रशिक्षण शिबिर आज पोलीस अधिक्षक कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या उपस्थितीत पार पडले. हे प्रशिक्षण उल्हास केळकर यांनी नांदेड पोलीस दलाला दिले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, नांदेड जिल्ह्यातील नुतन सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ, विकास तोटावार, मंदार नाईक, पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण शिबिर समापन झाले. यावेळी क्युआरटी आणि आरसीपीच्या जवानांनी उंचावर अडकलेल्या माणसाला परत आणण्यासाठी वर जाणे, खाली येणे, उंचावरून खाली उडी मारणे आणि आगीत अडकलेल्या माणसाला सोडवणणे असे अनेक प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी पोलीस दलातील अंमलदारांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले. आपत्तीमध्ये दुसऱ्यांना मदत करतांना आपला जीव सुरक्षीत राहणे महत्वपूर्ण आहे आणि त्यातून त्यानंतरच आपण इतरांना मदत करू शकतो याचे लक्ष नेहमीच ठेवायचे असते असे डॉ.विपीन म्हणाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करतांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी माझ्या पोलीस अंमलदारांना जे प्रशिक्षण मी दिले आहे त्यातून ते समाजाच्या रक्षणासाठी नेहमी प्रयत्न करीत असा मला विश्र्वास आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ म्हणाले की, नांदेड जिल्हा पोलीस दलातील जवानांना या प्रशिक्षणामधून भरपूर कांही मिळाले आणि त्याचा उपयोग ते आपल्या जीवनात काम करतांना ते करतील या उद्देशातून त्यांना तयार करून घेण्यात आले आहे. पोलीस दलातील अंमलदारांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक उल्हास केळकर म्हणाले मी माझ्यावतीने असे प्रशिक्षण देण्यासाठी नेहमी तयार आहे. त्यांनी एका दोरखंडामध्ये अत्यंत कमी वेळात अनेक गाठा मारण्याचे प्रात्यक्षीक दाखवले.
या आपत्ती व्यवस्थापन शिबिराची देखरेख अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक मुंजाजी दळवे, पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे यांनी केली. आजच्या समारोपप्रसंगी सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *