नांदेड(प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समितीने संचालकाच्या मनमानी कारभाराला विभागीय सहनिबंधक सरकारी संस्थाचे सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी चपराक दिली असून कृषी उत्पन्न बाजार समितीवर सचिव पदाचा कार्यभार वामन परसराम पवार यांना देण्याचे आदेश दिले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडची निवडणुक झाल्यानंतर सचिव पदाचा कार्यभार वामन परसराम पवार यांना न देता इतर संचालकांनी त्यांना डावलले होते. यावर वामन पवार यांनी विभागीय सहनिबंधक कार्यालय लातूर येथे अपील अर्ज क्र. 50/2021 दाखल केला. या अर्जात कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडचे सभापती आणि सचिव उत्तरार्थी आहेत. या निवडणुकीच्या संदर्भाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांनी 30 एप्रिल 2021 रोजी वामन पवार यांना सचिव पदाच्या पदभारातून मुक्त करण्यासाठी निर्गमीत केलेली नोटीस त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता काढली होती. हा नैसर्गिक न्याय तत्वानुसार चुकीचा प्रकार आहे आणि यासाठी विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी वामन पवार यांची अपील मंजूर करत कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडच्या सचिव पदाचा पदभार वामन पवार यांना द्यावा असे आदेश दिले आहेत. काही सहकारी संस्थामध्ये आपला मनमानी कारभार करणाऱ्या संचालकांना यामुळे चपराक बसली आहे.
