नांदेड(प्रतिनिधी)- देगलूर तालुक्यातील हणेगाव ते शिळवणी रस्त्यावर सोमवार दि.28 जून रोजी सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून सदरील युवक हा कोकलगाव येथील असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
आरिफ चांदपाशा पिंजारी (वय 22 वर्ष)असे युवकाचे नाव असून तो दि.27 जून रोजी हणेगाव येथून दुचाकी घेवून गेला होता.परंतु अचानकपणे दि.28 रोजी सकाळी त्याचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.मृत युवक हा रस्त्याच्या बाजूला कालव्यात पडले असल्याचे समजले.सदरील माहिती मरखेल पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि.आदित्य लोणीकर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जावून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र हणेगाव येथे आणले. सदरील युवकाचा मृत्यू घातपात आहे की आकस्मिक मृत्यू आहे. या विषयी कोकलगाव वासियांतून ठिकठिकाणी चर्चा होत आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तरुण युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजित बिरादार हे करत आहेत.