

नांदेड (प्रतिनिधी) – होळीच्या हल्ला बोल कार्यक्रमात घडलेल्या घटने प्रकरणात निष्पाप व निर्दोष लोकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घेण्यात यावेत या मागणीसाठी सोमवारी नांदेड येथे शीख धर्मीय महिलांनी धरणे आंदोलन केले. मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
सचखंड गुरुद्वारा तख्त चे मुख्य जथेदार सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ जी यांचा आशीर्वाद घेऊन धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. गुरुद्वारा लंगर साहिबचे जथेदार संत बाबा बलविंदरसिंघ जी यावेळी उपस्थित होते.
दि. 29 मार्च रोजी हल्ला मोहल्ला मिरवणुकी मध्ये काही समाज कंटकाच्या वतीने पोलीस प्रशासनावर हल्ले करुन, शासकीय संपत्तीची नासधुस करण्यात आली होती, या घटनेचा आम्ही तिवृ निषेध करतो. या प्रकरणात निष्पाप व निर्दोष लोकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घेण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
वरिष्ठ पोलीस अधिका-याचा दिशाभुल करुन निर्दोष व्यक्तीचे नावे सदरील गुन्हयामध्ये टाकण्यात आले आहे. त्याच्या हया घटनेमध्ये काही एक संबंध नव्हता. जिल्हाधिकारी साहेबांनी शांतता समिती च्या बैठकीमध्ये असे संबोधन आश्वासन दिले होते की, कुठल्याही निर्दोष व्यक्तीवर गुन्हे दाखल होणार नाही, आम्हा निर्दोष व्यक्तीवर झालेले गुन्हे मागे घेऊ, असे आश्वासन दिले होते. परंतु आज घटना होऊन 90 दिवसा झाले पण पोलीसांनी निष्पाप लोकांवर दोषपत्र कोर्टामध्ये दाखल केले आहे. हयामुळे संपुर्ण समाजामध्ये असंतोष पसरलेला आहे व भितीचे वातावरण पसरलेला आहे असे निवेदनात म्हटले आहे. युवा वर्ग मानसीक त्रासामुळे व्यसन चे आदी होत आहेत तरी मेहरबान साहेबांनी सदरील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कार्यवाही करुन, निर्दोष व्यक्तीची सुटका करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रेमजीतकौर कोल्हापुरे,नीलमकौर पुजारी,मंदीप कौर, गुरुप्रसाद कौर,प्रियंकाकौर दुकानदार,पिंकीकौर हंडी,नीलम कौर,प्रेमजीत कौर,प्रीतम कौर,हर्बन्स कौर,सुरजित कौर महाजन,ब्रिजपाल कौर,कीरपालकौर,तेजिंदर कौर,राजवंतकौर,धरमर्कौर,उतमकौर यांच्या सह शीख समाजातील जवळपास 70 महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत, त्यांनी धरणे आंदोलन मध्ये भाग घेतला.