नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरात एक जबरी चोरी झाली आहे. किनवट आणि उमरदरी ता.मुखेड येथून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या तीन चोऱ्यांमध्ये 81 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.
दिलीप विनायकराव खुडे हे 26 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजता व्यंकटेश गार्डन लोहा येथे असतांना तीन जणांनी मिळून त्यांच्या खिशातील 5 हजार रुपये रोख रक्कम, शेख मुर्तुजा सरवरसाब यांच्या खिशातून 26 हजार रुपये रोख रक्कम अशी एकूण 31 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे. लोहा पोलीसंानी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक कऱ्हे अधिक तपास करीत आहेत.
देवानंद मारोतीराव गव्हाणे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.पी.9146 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी 27 जूनच्या दुपारी 12.30 ते 1 अशा अर्ध्या तासाच्या वेळेत ऐरीगेशन कॉलनी गोकुंदा, किनवट येथून चोरीला गेली आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार चौधरी हे करीत आहेत.
शामसुंदर जळबा दारकु यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उमरदरी ता.मुखेड येथे त्यांच्या घरासमोर दि.23 जून रोजी रात्री 9.30 वाजता उभी केलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.29 के.9231 ही 24 जूनच्या सकाळी 7 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 20 हजार रुपये आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार महिंद्रकर अधिक तपास करीत आहेत.
