नांदेड

29 मार्चच्या घटनेत शीख समाजावर अन्याय झाला -निवेदन

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शीख गुरूद्वारा तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब ऍक्ट-1956 च्या कलम 11 मध्ये केलेले संशोधन रद्द करून गुरूद्वारा बोर्ड बरखास्त करण्यात यावी. तसेच 29 मार्च 2021 रोजी गुरूद्वारा परिसरात घडलेल्या  दुर्घटनेत शीख लोकांवर बेकायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस कोठडीत मारहाण करण्यात आली. याबाबत सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी आणि स्थानिक शीख समाजाला न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रे्रसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले.
शीख गुरूद्वारा कायद्यामध्ये कलम 11 संशोधीत करून गुरूद्वारा बोर्डाचा अध्यक्ष नेमण्याचा अधिकार शासनाने स्वत:कडे घेतले. ते संशोधन रद्द करून गुरूद्वारा बोर्ड बरखास्त करण्यात यावा. गुरूद्वारा बोर्डाचे उपाध्यक्ष गुरविंदरसिंघ बावा यांची गुरूद्वारा बोर्डावर नियुक्ती झाल्यापासून ते स्थानिक शीख समाजाच्याविरोधात काम करत आहेत. त्यांनीच आपल्या पदाचा, राजकीय बळाचा व आर्थिक ताकदीचा वापर करून शीख समाजातील अनेक लोकांवर गुन्हे नोंदविले आहेत. भुपिंदरसिंघ मन्हास हे नियुक्त अध्यक्ष आहेत. त्यांनी शासनाविरूद्ध, कायद्याविरूद्ध, गुरूद्वारा साहिब नांदेडविरूद्ध आणि नांदेड येथील शीख समाजाविरूद्ध मनमानी केली आहे. अनेक बेकायदेशीर ठराव घेऊन नुकसान केले आहे.
या संदर्भाने अनेक निवेदन देऊन सुद्धा अद्याप काही कार्यवाही झालेली नाही. गुरूद्वारा बोर्डात शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीचे वर्चस्व आहे. स्थानिक सदस्यांना डावलले जात आहे. शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीद्वारे होणारा धार्मिक व राजकीय हस्तक्षेप स्थानिक शीख समाजाद्वारे सहन केला जाणार नाही, असे या निवेदनात लिहिले आहे.
29 मार्च रोजी गुरूद्वारा येथून काढण्यात येणाऱ्या हल्ला-महल्ला काही समाज कंटकांनी स्थानिक शीख समाजाची बदनामी व्हावी या दृष्ट हेतूने धार्मिक कार्यक्रमास गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यादिवशीच्या घटनेसंदर्भाने वजिराबाद पोलिसांनी 113, 114, 115 क्रमांकाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. यात 27 लोकांना अटक झाली, अनेक निष्पाप लोकांना जबरदस्तीने पोलीस ठाण्यात डांबून मारहाण करण्यात आली आहे. पुजेचे शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत. मॅनेज करून काही लोकांची नावे पोलीस अभिलेखातून कमी करण्यात आली आहेत. याबाबत केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी
गुरूद्वारामध्ये होणारे प्रत्येक दैनंदिन कामकाज व सणाच्या मिरवणुकांची जबाबदारी गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे असते. होळी सणाच्या मिरवणुकीची सर्व जबाबदारी लक्षात घेऊन हे काम केले असते तर दुर्घटना घडली नसती. जबाबदार व्यक्ती असताना गुरूद्वारा बोर्ड अध्यक्ष व उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या लोकांची नावे पोलीस प्राथमिकीमध्ये नोंदवावीत असे अनेक निवेदन दिलेले आहेत, तरी कारवाई झालेली नाही. या निवेदनावर राष्ट्रवादी स. मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ गं्रथी यांची स्वाक्षरी आहे. निवेदन देताना अनेक शीख बांधव उपस्थित होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.