नांदेड (प्रतिनिधी)- भारत सरकार शिष्यवृत्ती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम त्वरीत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी असे निवेदन ना. धनंजय मुंडे यांना नसोसवायएफ यासंघटनेने दिले आहे.
शैक्षणिक वर्षे 2019-20 मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत भारत सरकारची शिष्यवृत्ती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची पूर्ण रक्कम विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली नाही. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना संविधानाच्या धोरणानुसार शैक्षणिक संवर्धन होण्यासाठी अश्वस्त केलेले आहे.पण सन 2019-20 चे शैक्षणिक वर्षे संपले आहे तरी शिष्यवृत्तीचे रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यातून राज्य सरकारची भुमिका मागासवर्गीय शैक्षणिक वर्गाच्या धोरणाविरोधात दिसत आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जात आहे. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना रूम किरायाने द्यायला तयार नाही. भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम येत्या 15 जुलै 2021 पर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागणार नाही,यासाठी प्रयत्न करावेत असे लिहिलेले आहे. असे घडले नाही, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे आंदोलन करावे लागेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी समाज कल्याण विभाग आणि राज्य शासनाची राहील असे निवेदनात लिहिले आहे. या निवेदनाची प्रत आयुक्त समाज कल्याण कार्यालयनांदेड यांनाही देण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष धम्मा वाढवे, प्रकाश दिपके, अक्षय कांबळे, शुभम दिग्रसकर, मनोहर सोनकांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
