नांदेड (प्रतिनिधी)- राजकारणामध्ये नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कोणी अधिकारी आरोप करू शकतो पण अशा अधिकाऱ्यांच्या आरोपांची भिती दाखवत राजकारणावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे देशातील लोकशाही संपुष्ठात येईल अशी भिंती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रवर्तन निदेशालयाने केलेल्या कारवाईबद्दल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जयंत पाटील बोलत होते.
एनआयएने मनसुख हिरेन यांच्या हत्येचा मुख्य उद्देशापासून दूर जात अटक केलेल्या व्यक्तींकडून काही तरी वधून घेतले आणि त्या सार्वजनिक जीवनात काम करणऱ्या लोकांना त्रास देण्याचा नवा प्रकार देशात भाजपने सुरू केलेला दिसतो, असे जयंत पाटील म्हणाले. परमवीरसिंहने आयुक्त पदावरून हटविल्यानंतर आरोप केले आहेत. याचा अर्थ त्यात अगोदर तुम्ही सहभागी होता काय? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. कोणीतरी अ आणि ब चनाव घेत असेल तर त्यावर कारवाई होत असेल तर ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. केंद्र सरकारच्या तपास संस्था असच घाबरण्याचं काम करम राहीले तर देशातील लोकशाहीला सुरंग लागेल असे विधान जयंत पाटील यांनी केले.
