महाराष्ट्र

28 जूनपासून शनिवार व रविवार संपूर्ण बंद

अत्यावश्यक सेवा चार वाजेपर्यंत सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी कार्यालयाने यापुर्वी काढलेले 20 आदेश, मुख्य सचिवांनी काढलेले 20 आदेश अशा दोन खंडी आदेशांचा संदर्भ देवून सोमवार दि.28 जून पासून कोरोना काळाच्या संदर्भाने नवीन मार्गदर्शक सुचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जारी केल्या आहेत. त्यामध्ये नव्याने प्रतिबंधात्मक आदेश सुध्दा जारी होतील असे नमुद केले आहे.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संक्रमणाचा दर ओसरत आहे. पण डेल्टा प्लस या विषाणूने अनेक रुग्ण बाधीत आहेत. विषाणूमध्ये झालेला हा बदल आणि त्यामुळे फैलाव होण्याची परिस्थिती लक्षात घेवून 28 जून 2021 पासून विविध सेवा आणि आस्थापना यांच्यासाठी नवीन वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
अत्यावश्यक सेवाशी संबंधीत सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावशक सेवेशिवाय इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते 4 या वेळेपर्यंत सुरू राहतील. यामध्ये शनिवार व रविवार वगळून असे लिहिले आहे. मॉल्स, सिनेमा, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह पुर्णपणे बंद राहतील. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार या दोन दिवशी फक्त पार्सल आणि होम डिलेव्हरी देता येईल. सार्वजनिक ठिकाणी फिरणे, सायकलींग सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत करता येईल. कार्यालयात शासकीय कार्यालय आणि इतर सुट असलेली खाजगी कार्यालये यामध्ये 50 टक्के उपस्थितीसह कार्यालये सुरू ठेवता येईल. चित्रीकरणासाठी निश्चित केलेल्या बंदीस्त ठिकाणी व अशा ठिकाणी इतरांना प्रवेशासाठी बंदी असेल. सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे चित्रीकरण करता येईल. शनिवार आणि रविवार बंद राहील. सामाजिक, सांस्कृतीक आणि करमणुकीचे कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार दरम्यान 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत करता येईल. लग्नासाठी 50 व्यक्तीची मर्यादा आहे आणि अंतयात्रेत ही मर्यादा 20 आहे. बैठका, निवडणुका, सर्वसाधारण सभा 50 टक्के क्षमतेसह करता येतील. बांधकामच्या ठिकाणी मजुरांच्या राहण्याची सोय करून बांधकामे चालू ठेवण्यास मुभा आहे. मजुरांना राहण्याची सोय नसेल तर दुपारी 4 वाजेपर्यंत बांधकाम करता येईल. कृषी व कृषीपुरक सेवा संपूर्ण आठवडाभर दुपारी 4 वाजेपर्यंत ई कॉमर्स व वस्तुसेवा नियमित सुरू राहतील. व्यायामशाळा, केस कर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पॉ, वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेसह पुर्व सुचना देवून दुपारी 4 वाजेपर्यंत चालू राहतील या ठिकाणी वाताणुकीत यंत्र सुरू ठेवता येणार नाही. मालवाहतुक तीन व्यक्तीसह नियमित सुरू राहील.खाजगी वाहने, लांबपल्याच्या रेल्वे सुरू राहतील. पण स्तर पाचमध्ये जाण्यासाठी किंवा स्तर पाचमध्ये थांब घेवून पुढे जाणाऱ्या प्रवाशांना ई पास आवश्यक राहिल. उत्पादन क्षेत्र नियमित चालू राहील. निर्माण क्षेत्र नियमित चालू राहिल.
या आदेशात अत्यावश्यक सेवेमध्ये 31 विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे आणि त्या सर्व सेवा सुरू राहतील. आज निर्गमित केलेल्या अदेशाची अंमलबजावणी 28 जून 2021 च्या सकाळी 7 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. नांदेड जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा बाधीत होण्याची टक्केवारी, ऑक्सीजन खाटांची गरज यामध्ये वाढ झाल्यास नव्याने नवीन प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित होणार आहेत. जनतेने मास्क, सॅनेटायझर, शारिरीक अंतर या सर्व सुचनांचा काटेकोर अंमल करावा जेणे करून कोविड रुग्ण किंवा डेल्टा प्लस रुग्ण नव्याने वाढणार नाहीत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *