नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.26 जून रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास दुचाकीवर येणाऱ्या पती-पत्नीपैकी पत्नीच्या गळ्यात सोन्याचे गंठण दोन चोरट्यांनी तोडून पळ काढला आहे. या सोन्याची किंमत 1 लाखापेक्षा जास्त असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाचा गुन्हा नोंद झाला नव्हता.
आज दुपारी 4 वाजता नारायणनगर भागातील सुरेश इंगोले हे आपल्या पत्नीला दुचाकीवर बसवून नारायणनगर ते लालवाडी पुलाखालून कलामंदिरकडे येत असतांना खडकपुरा ते पक्कीचाळ पोलीस चौकीच्या रस्त्यावर दोन चोरटे त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवर आले आणि त्यांच्या पत्नी रेखा यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून पळाले. रेखा इंगोले यांनी आरडा ओरड केली तेंव्हा सुरेश इंगोले यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला पण ते सापडले नाहीत. ते कलामंदिरमार्गे पुढे कोठे तरी निघून गेले आहेत. तोडलेल्या गंठनपैकी कांही भाग रेखा इंगोले यांच्या हातात शिल्लक राहिला. चोरट्यांनी नेलेल्या गंठणाची किंमत 1 लाख असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. पोलीसांनी या संदर्भाने त्वरीत प्रभावाने गंठण चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. वृत्तलिहिपर्यंत या गुन्ह्याची तक्रार दाखल झाली नव्हती.
