नांदेड(प्रतिनिधी)-अवैध वाळू उत्खनन कितीही कार्यवाही केल्या तरी सुरूच आहे. सोबतच अवैध वाळूची रात्रीची वाहतूक सुध्दा सुरू आहे ही बेकायदेशीर आहे. तरीपण आज नायब तहसीलदार मुगाजी काकडे आणि विजयकुमार पाटे यांना माहिती मिळाल्यानंतर महसुल पथकाने थुगाव येथे दोन सेक्शनपंप ज्याद्वारे वाळू उत्खनन होते. ते पंप उध्दवस्त केले.
26 जून रोजी दुपारी थुगाव येथे सेक्शनपंपाद्वारे वाळूचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार पाटे आणि काकडे यांनी या बाबतची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन, उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण, तहसीलदार किरण अंबेकर यांना दिली आणि महसुल विभागाचे पथक दुपारी 12 वाजता थुगाव येथे पोहचले. जिलेटीनचा वापर करून त्याचा स्फोट घडवून अवैध वाळू उत्खनन करणारी दोन बोटी नष्ट करण्यात आल्या. तसेच 12 तराफे जाळण्यात आले.
ही कार्यवाही मंडळाधिकारी चंद्रशेखर सहारे, गजानन नांदेडकर, अनिल धुळगंडे, अनिरुध्द जोंधळे, तलाठी मिरा चिदगिरे, रेखा राठोड, सचिन नरवाडे, मंगेश वांगीकर, राहुल चव्हाण यांनी लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.ए.पल्लेवाड यांच्या अनेक पोलीस अंमलदारांना सोबत घेवून पुर्ण केले. तहसीलदार किरण अंबेकर यांनीआवाहन केले आहे की, अवैध रेती उत्खनन करणाऱ्या लोकांवर अशीच कायदेशीर कार्यवाही यापुढेही सुरूच राहिल.
