पोलीस अधिक्षक कार्यालयात छत्रपती शाहु जयंती साजरी
नांदेड(प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहु महाराजांना अभिवादन करतांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी राजर्षी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपण जीवन जगण्याची गरज असल्याचे सांगितले.
आज राजर्षी छत्रपती शाहु महाराजांची 147 वी जयंती साजरी करतांना प्रमोदकुमार शेवाळे बोलत होते. याप्रसंगी शेवाळे म्हणाले की, राजर्षीनी आपल्या जीवनात समतेचा धडा देवून सर्वांना एकच न्याय देण्याची शिकवण दिली आहे. आपण पोलीस दलात काम करतो तेंव्हा आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला आपण न्याय दिला पाहिजे. जी शिकवण आम्हाला छत्रपती शाहु राजांनी दिली आहे.
याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृहपोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, नियंत्रण कक्षात पोलीस निरिक्षक अशोक अनंत्रे, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पोलीस उपनिरिक्षक सय्यद मुनीर, जनसंपर्क कार्यालयाचे पोलीस अंमलदार उत्तम वाघमारे, रेखा इंगळे, पोलीस अधिक्षक कार्यालयातील विविध शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार आणि मंत्रलयीन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
