ताज्या बातम्या विशेष

अग्नीशमन दलाच्या नवीन इमारतीसमोर हॉटेल बंद करून सुरू झाली मटका बुक्की

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अग्नीशमन दलाची इमारत तयार होत आहे. त्या ठिकाणी त्या इमारतीसमोर हॉटेल व्यवसाय बंद करून मटका जुगाराचा व्यवसाय सुरू झाला आहे. या मटक्याच्या दुकानावर नियंत्रण कोणाचे तरी आहे आणि मेहनत करणारा वेगळाच आहे. कांही विशिष्ट लोकांवर मटका जुगाराची कार्यवाही करून पोलीस इतरांना त्यातून सुट देत आहेत.
मटका जुगार हा एक चांगला व्यवसाय आहे. त्याचे प्रत्यंतर यावरुन आले की, एका हॉटेल व्यवसायकाने स्वत:ची हॉटेल बंद करून त्या ठिकाणी मटका बुक्की सुरू केली. त्या बुक्कीमध्ये भरपूर टेबल आणि बेंच आहेत. ही बुक्की अग्नीशमन दलाच्या नवीन तयार होणाऱ्या इमारतीजवळ आहे. हॉटेल व्यवसायकाचे घर सुध्दा तेथेच आहे. कांही मंडळींमुळे या बुक्की चालकांना त्रास होवू लागला तेंव्हा या भागातील मटका किंगने ही बुक्की आपल्या ताब्यात घेतली असून हॉटेल व्यवसायीकाला रोजंदारीप्रमाणे रक्कम दिली जात आहे.
याभागातील मटका किंग हा मागे एका व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे प्रसिध्दीत आला होता. त्यानंतर त्याला असे वाटते की, माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही म्हणून अग्नीशमन दलाच्या इमारतीजवळची मटका बुक्की त्याने आपल्या ताब्यात घेतली आणि त्याच्या देखरेखीत हा मटकाबुक्कीचा कारभार सुरू आहे. या भागात पोलीस कांही विशिष्ट लोकांना टार्गेट करतात पण मटका किंग असलेल्या माणसावर कांही एक कार्यवाही होत नाही. त्याने एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्याही वेळेस त्याच्यावर प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही. मी सर्वांना सांभाळतो असा त्याचा एक स्वत: बद्दलचा विश्र्वास आहे. असू द्या मटका सुरूच राहिला पाहिजे. कारण अनेकांचे पोट भरतात आणि अनेकांना रोजगार मिळतो. कांही मंडळी गर्भ श्रीमंत होतात. कांही मंडळी आपल्या लेकरांचे शिक्षण यांच्याकडून मिळणाऱ्या भिकेवर चालवतात.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.