ताज्या बातम्या

50 आरोपी फरार सदरात दाखवून 77 जणांविरूद्ध पोलीस हल्ला प्रकरणाचे दोषारोप पत्र दाखल 

नांदेड (प्रतिनिधी)- 29 मार्च रोजी वजिराबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्यासंदर्भाने वजिराबाद पोलिसांनी अटक अर्थात सध्यातुरूंगात असलेले आरोपी आणि 50 आरोपी फरार या रकान्यात दाखवून दोषारोप पत्र दाखल केले आहे. यामध्ये 25 मे रोजी पोलिसांच्या अभिलेखात नव्याने आलेला आरोपी रणदिपसिंघ उर्फ दिपू महाराज याचेही नाव आरोपी क्र. 65 वर लिहिलेले आहे. या प्रकरणातील फरार दाखवण्यात आलेले 50 आरोपी आणि त्यांच्यावरील कायदेशीर प्रक्रिया कधी पूर्ण होईल याचे उत्तर मात्र दोषारोप पत्रात सापडत नाही. या आरोपपत्रात तीन आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत.
29 मार्च रोजी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 61 नावांसह पोलीस प्राथमिकी देण्यात आली. ज्यांनी पोलिसांवर जिवघेणा हल्ला केला असा त्यांच्यावर त्या तक्रारीनुसार आरोप आहे. पहिल्याच दिवशी 20 आरोपी पकडण्यात आले होते. त्यानंतर एक-एककरत हा आकडा 27 पर्यंत गेला. दरम्यान काही जणांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय येथे अटकपुर्व जामीन अर्ज सादर केले. त्यातील काही जणांचा अटकपूर्व जामीन मागणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये नमुद असलेल्या विहीत वेळेनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर 90 दिवस पूर्ण होण्याअगोदर दि. 24 जून 2021 रोजी वजिरबाद पोलिसांनी गुन्हा क्र. 114/2021चे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केला. या प्रकरणातील 27 जण तुरूंगात आहेत.
अटकेत असलेल्या आरोपींची नावे हरनेकसिंघ मुन्नासिंघ तोपची, अजितपालसिंघ उर्फ गब्बू, प्रितपालसिंघ ग्रंथी, अमरजितसिंघ उर्फ राजू, बसंतसिंघ महाजन, मनिंदरसिंघ जसपालसिंघ लांगरी, अभिजीतसिंघ रजपालसिंघ सरदार, विक्रमजितसिंघ हरभजनसिंघ सेवादार, एक विधीसंघर्ष बालक, सुलिंदरसिंघ उर्फ मोनू, रूपसिंघ रायके, इंदरसिंघ उर्फ बबलू, लोचनसिंघ भट्टी, जसवंतसिंघ उर्फ चन्नू किशनसिंघ सिरपल्लीवाले, जगजीतसिंघ उर्फ राजा उर्फ राज भगवानसिंघ घडीसाज, परमजितसिंघ सरदारसिंघ पूजारी, सुख्खासिंघ भगवानसिंघ बावरी, हरभजनसिंघ देवसिंघ पहरेदार, कश्मिरसिंघ प्रेमसिंघ भट्टी, ललकारसिंघ पूनमसिंघ जुन्नी, बलवंतसिंघ सुलतानसिंघ टाक, हरप्रितसिंघ उर्फ कालू रणजितसिंघ गरेवाल, सुदर्शनसिंघ कुलवंतसिंघ शाहू, राणासिंघ मायासिंघ टाक, एक विधीसंघर्ष बालक, मनमोहनसिंघ उर्फ सन्नीसिंघ देवेंद्रसिंघ सेवादार (पाठी), सतनामसिंघ हरीसिंघ उर्फ पट्टूसिंघ पुजारी, प्रतापसिंघ उर्फ छोटूसिंघ बाबुसिंघ सीरपल्लीवाले, विधीसंघर्ष बालक, अमरजितसिंघ उर्फ अमन सुंदरसिंघ सीरपल्लीवाले, गोविंदसिंघ उर्फ गोविंद राणा चव्हाण उर्फ गोविंदसिंघ सोडेवाला असे 27 जण आहेत.
फरार दाखवून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 299 प्रमाणे दाखविलेले या गुन्हा क्र. 114/2021 मधील आरोपी बलप्रितसिंघ उर्फ आशिष नानकसिंघ सपुरे, गुरमीतसिंघ उर्फ बादल देवेंद्रसिंघ महाजन, रणज्योतसिंघ जगींदरसिंघ सुखई मनमोहन उर्फ कुणालसिंघ राजेंद्रसिंघ नंबरदार, नानकसिंघ बाबूसिंघ बासरीवाले, लखनसिंघ उर्फ लल्ल्या भोलासिंघ खालसा, रोनकसिंघ बलवंतसिंघ गाडीवाले, मनूसिंघ बलवंतसिंघ गाडीवाले, भानूसिंघ बावनसिंघ गाडीवाले, सतनामसिंघ उर्फ रणजितसिंघ मोहनसिंघ मन्नी, तेजेश्वरसिंघ उर्फ ब्रम्हा इंदरसिंघ चंदन, जगींदरसिंघ उर्फ जग्गी मुक्त्यारसिंघ उर्फ शेरसिंघ रागी, वंशसिंघ उर्फ वंश भागींदरसिंघ तबेलेवाले, मनकरणसिंघ उर्फ मन्नी हरविंदरसिंघ सुखमनी (मलेरियावाले), बलबिरसिंघ उर्फ बिट्टू गुरमेलसिंघ पवार उर्फ रागी, शेरूसिंघ सोजितसिंघ भांड, दलबिरसिंघ बसाकसिंघ हापुर, मनज्योतसिंघ हुकूमसिंघ काराबीन, तेजबिरसिंघ उर्फ पन्नू सरजितसिंघ गिल, गंगनसिंघ भगवानसिंघ सपुरे, चंदासिंघ उर्फ विक्की डिच्चीक करतारसिंघ लांगरी, सुखविंदरसिंघ उर्फ सुख्खा बक्षीससिंघ हुंदल, विक्रमजीतसिंघ उर्फ विक्की, सुखविंदरसिंघ उर्फ सुख्खा हुंदल,अवतारसिंघ रणजितसिंघ गरेवाल, गुरमीतसिंघ उर्फ राजू किडा मदनसिंघ बुंगई, अमरप्रितसिंघ उर्फ विक्की जगींदरसिंघ हंडी, दिपसिंघ गुलाबसिंघ पाठी, बलविरसिंघ उर्फ टिटू बटेरा महेंद्रसिंघ बुंगई, गुरप्रितसिंघ उर्फ बंटी अमोललखसिंघ ढिल्लो, रविंद्रसिंघ लक्ष्मणसिंघ जंगी, हरजिंदरसिंघ उर्फ जिंदरसिंघ जंगींदरसिंघ बुंगई, हरजितसिंघ कवलजितसिंघ अरोरा, सरजितसिंघ उर्फ गोलू मनजितसिंघ बोरगाववाले, मनजितसिंघ उर्फ डक्का रूपसिंघ रायके, लक्कीसिंघ उर्फ लक्की चंदासिंघ हकीम, हरप्रितसिंघ चंदासिंघ हकीम, जसप्रितसिंघ उर्फ रोहित हरभजनसिंघ सेवादार (पहरेदार), धुपीया, पहरेदार, सुरेंद्रपालसिंघ उर्फ जम्मू कश्मिरसिंघ हंडी, बलप्रितसिंघ राजिंदरसिंघ चावला, जसविंदरसिंघ करमसिंघ दिनपूर, रविंद्रसिंघ आशासिंघ बुंगई, गुरमीतसिंघ उर्फ राजे हरमीतसिंघ उर्फ लढ्ढूसिंघ महाजन, गुलामसिंघ चंदासिंघ कंधारवाले, देवेंद्रसिंघ हजुरासिंघ मोटरावाले, हरविंदरसिंघ उर्फ लक्की गुरदीपसिंघ लांगरी, रणदिपसिंघ उर्फ दिपू महाराज,ईश्वरसिंघ सरदार अशी आहेत.
हा गुन्हा दाखल झाला तेव्हा दोन अपर पोलीस अधीक्षक, सहा पोलीस उपअधीक्षक असंख्य पोलीस अंमलदार यांनी या प्रकरणात 200 जण गुन्हेगार आहेत, अशी एक यादी तयार केली होती. त्यानंतर ती यादी 144 झाली आणि आता दोषारोपत्र दाखल करताना 27 तुरूंगात असलेले आणि 50 हजार अशा 77 जणांविरूद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.  मग तयार झालेल्या यांद्यामधील माणसांची नावे कमी कशी झाली या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एखाद्या विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करावी लागेल. या प्रकरणात काही ठिकाणी पोलीस खाते करील तेच होईल या म्हणीचे प्रत्यंतर लोकांना मिळाले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *