नांदेड (प्रतिनिधी)- वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात समता फाऊंडेशनने 15 जूनपासून लस उत्सवाचे भव्य आयोजन केले आहे. आतापर्यंत 14 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. येत्या 10 दिवसात 30 हजार नागरिकांना लस दिली जाणार आहे. असा लस उत्सव आयोजित करुन समता फाऊंडेशनने देशासमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.
पुरुषोत्तम अग्रवाल यांनी समता फाऊंडेशनची स्थापना केली. मागील अनेक वर्षापासून या संस्थेने मोठे समाजकार्य केले आहे. कोविड संकट काळात या संस्थने गरीब व गरजू लोकांना जेवण, अन्न-धान्य, मास्क सॅनिटायझरचे वाटप केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 जून रोजी लसीकरण मोहिमेची घोषणा केली होती. पंतप्रधानांच्या आवाहनास समता फाऊंडेशनने प्रतिसाद देऊन लस उत्सव आयोजित केला. 15 जूनपासून 14 हजार लोकांना लस देण्यात आली. येत्या 10 दिवसात 30 हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल. या लस उत्सवास रिसोड नगर परिषद, वाशिम जिल्हा परिषद, तालुका व ग्रामीण पत्रकार संघ, तहसीलदार, सिटी केअर सेंटर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले आहे.
सध्या महाराष्ट्रात समता फाऊंडेशन या संस्थेच्या कार्याची मोठ चर्चा सुरु आहे. समता फाऊंडेशन या संस्थेने लस उत्सव आयोजित करुन आपले वेगळेपण सिद्ध आहे. संस्थेला पुरुषोत्तम अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले आहे.