

इतवाराचे सुधाकर आडे झाले पोलीस निरीक्षक
नांदेड,(रामप्रसाद खंडेलवाल)- पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या मान्यतेने अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी राज्यातील १७ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती दिली आहे. त्यातील तीन नूतन पोलीस निरीक्षक नांदेड जिल्ह्यात येत आहेत.नांदेड येथे कार्यरत सुधाकर आडे सुद्धा पोलीस निरीक्षक झाले आहेत. पुढे याच महिन्यात एक पोलीस निरीक्षक पदोन्नतीची जंबो यादी येणार असल्याची शक्यता आहे.
डिसेंबर २०२० मध्ये सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यासाठी मागवण्यात आलेल्या माहितीतील काही सहायक पोलीस निरीक्षकांची पदोन्नती आस्थापना मंडळाने राखून ठेवली होती.त्यातील १७ सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देत पोलीस निरीक्षक पद देण्यात आले आहे. नांदेड शहरात इतवारा पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर भाऊसिंग आडे हे सुद्धा पोलीस निरीक्षक झाले आहेत. त्यांना नांदेड जिल्ह्यातच नवीन नियुक्ती देण्यात आली आहे. या सोबत ठाणे शहरातील अभिषेक लक्ष्मण शिंदे यांना आणि परभणी येथील नितीन भास्करराव काशीकर यांना नांदेड जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदोन्नती प्राप्त करणारे इतर अधिकारी पुढील प्रमाणे आहेत.त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे.शुंभागी एकनाथ वानखेडे – नागपूर शहर (नागपूर शहर),शबनम निझाम शेख – पुणे शहर (पुणे शहर), प्रताप पांडुरंग दराडे – पालघर (महाराष्ट्र पोलीस अकादमी नासिक), मनीष मोहन पाटील-पुणे शहर (बीड), धीरज प्रकाश महाजन – नंदुरबार (धुळे), अशोक उमाजी शरमाळे – मुंबई शहर(नासिक शहरदत्तात्रय सखाराम शिंदे-पुणे शहर (धुळे), दीपक बाळकृष्ण भिताडे-पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई (नागपूर शहर), विजय भीमराव नाईक-नागपूर शहर (नागपूर शहर), प्रवीण वासूदेव वांगे – दहशतवाद विरोधी पथक मुंबई (अमरावती शहर), मिलिंद प्रल्हाद खोपडे- जालना (रायगड), नीरज पंजाबराव चौधरी – ठाणे शहर (नवी मुंबई), किरण बाजीराव शिंदे – गुन्हे अन्वेषण विभाग (जळगाव), राजीव यादवराव शेजवळ – नवी मुंबई (नवी मुंबई) असे आहेत. नवीन पदोन्नती प्राप्त करणाऱ्या पोलीस निरीक्षकांचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी अभिनंदन केले आहे.