नांदेड(प्रतिनिधी)-किनवट तालुक्यातील कोठारी जाणाऱ्या रस्त्यावर एक 45 वर्षीय व्यक्तीने आपली दुचाकी हयगईने चालवून स्वत:च्या मरणास कारणीभूत झाला आहे. तसेच बारड ते भोकर फाटा जाणाऱ्या रस्त्यावर एक कार उलटून एका व्यक्तीचा मृतू झाला आहे.
तिरुपती विश्र्वनाथ डाखोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जूनच्या पहाटे 5 ते 6 वाजेदरम्यान बारड ते भोकरफाटा जाणाऱ्या रस्त्यावर भारत पेट्रोल पंपासमोर कार क्रमांक एम.एच.26 डी.एक्स. 0247 च्या चालकाने आपली गाडी हायगई आणि निष्काळजीपणे चालवून ती कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्यात पलटी केली त्यामुळे उंकेश्र्वर विश्र्वनाथ डाखोरे (23) रा.ढोकी ता.जि.नांदेड यांचा त्या अपघातात मृत्यू झाला आहे. अर्धापूर पोलीसांनी कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कल्याण मागुळकर अधिक तपास करीत आहेत.
दशरथ गंभीरा राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 मे च्या सायंकाळी 7 वाजता किनवट ते कोठारी जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी क्रमांक एम.एच.05 ई.एम.2125 अत्यंत निष्काळजीपणे चालवून रोहिदास गंभीरा राठोड (45) रा.रायपूर तांडा ता.किनवट हे त्यांचे बंधू मरण पावले आहेत. मांडवी पोलीसंानी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हारी शिवरकर हे अधिक तपास करीत आहेत.
